कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आडगाव येथे कोरोना संसर्गाने कहर केल्याने एकाच दिवशी तीन जणांचा बळी गेला.
जळगाव येथे शिक्षक असलेले जितेंद्र अभिमन्यू पाटील (वय ४६) यांचे दि. २० रोजी रात्री निधन झाले. ते ध खं पाटील शाळेचे निवृत्त पर्यवेक्षक ए एस पाटील यांचे एकूलते चिरंजीव होते. सोपान शहादू चौधरी (वय ६२) हे स्वातंत्र्य सैनिक कै. शहादू चौधरी यांचे चिरंजीव होत. व भानुदास हिरामण देवरे (वय ५२) या तिघांचा एकाच दिवशी कोरोनामुळे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गावातील अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गावातील बरीच संख्या पॉझिटिव्ह असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे अनेकांची घरे उध्वस्थ होत आहे. तरी प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहान करण्यात आले.