अमळनेर (प्रतिनिधी) मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने सात जणांनी तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे एकटे राहत असून हिंगोणे बुद्रुक येथे त्यांची पत्नी व दोन्ही मुली राहतात. १० रोजी फिर्यादीस त्यांच्या पत्नीने फोन करुन सांगितले की, त्यांची १५ वर्षीय मुलगी घरात लहान बहिणी सोबत असताना हितेश मिलिंद साळुंखे याने घरात घुसून तिची छेड काढली. त्यामुळे फिर्यादी लगेच ११ रोजी गावी पोहोचले. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घराजवळ उभे असताना मिलिंद साळुंखे, हितेश मिलिंद साळुंखे, मनीषा मिलिंद साळुंखे, ललिता फकिरा थोरात, सीमा पवार, अशोक छगन थोरात, जिजाबाई अशोक थोरात हे गोळा झाले. त्याचवेळी मिलिंद याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारुन त्यांना खाली पाडले. त्यानंतर इतर संशयितांनी दगड, विटांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नी वाचण्यास आली असता तिलाही लाथाबुक्क्यानी मारहाण करत विटा मारून फेकल्या. या वेळी आजुबाजूच्या लोकांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीची सोडवणूक केले. त्याचवेळी या सर्वांनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचे केस ओढून बाहेर काढले. त्यावेळी हितेश याने मुलीच्या तोंडावर, छातीवर व डोक्यावर मारहाण केली. तसेच सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
















