जळगाव (प्रतिनिधी) येथील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष देत तिच्यावर तीन वर्ष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विवाह झाल्यानंतर तिच्या घराजवळच राहणाऱ्या राजेश भीमराव साळुंखे याच्या सोबत प्रेम संबंध जुळले होते. राजेश साळुंके याने लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान, तिच्या पतीला याबाबत कळल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. राजेश साळुंके याने एका मंदिरात विवाह केला त्यानंतर विवाहितेला त्याच्यामुळे एक अपत्य देखील झाले.विवाहितेसोबत राहत नव्हता. काही दिवस दोघे मालेगाव येथे राहिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ त्याला घेऊन जळगावी निघून आले. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. एकदा राजेशने विवाहितेला हॉटेलमध्ये घेऊन जात जबरदस्तीने अत्याचार केला.
राजेश आपल्यासोबत राहण्यास येत नसून एक अपत्य जन्माला घालत आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने विवाहितेने रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.