रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कर्जोंद शिवारात पोलीस बंदोबस्तावर असतांना आरोपींनी आरडाओरडा करीत मारहाण व शिवीगाळ करून पोलिसांवर दगडफेक केली असून रावेर पोलिसात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, रावेर तालुक्यातील कर्जोंद शिवारातील गट नं २४७ ब मधील शेती वहिवाट रस्ता मोकळा करून तार कंपाउंड करण्याकामी पोलीस बंदोबस्तावर असतांना आरोपींनी आरडाओरडा करीत मारहाण व शिवीगाळ करून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात फौजदार मनोज वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीराम वानखेडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल माधवी मोरे हे जखमी झाले आहेत.
याबाबत महिला पोलीस कॉन्स्टेबल माधवी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गोकुळ हुकूमचंद चारण, देवा नारायण चारण, हुकुम किसन चारण, पुनाबाई हुकुम चारण, रमाबाई देवा चारण आदी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्या. ए. एच. बाजड यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.