गोंदिया (वृत्तसंस्था) जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक १ बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला असून, मृतक वाघाचे नख (Tiger Claw) आणि दात (Teeth) गायब (Missing) असल्याने मृतक वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक दृष्या आढळून आले आहे. त्यामुळे वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक १ बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला असून मृतक वाघाचे नखे आणि दात गायब आहेत. यावरून मृतक वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक आंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेनंतर वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली असून वन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असून याबाबत कोणतेही भाष्य करण्यास अधिकार्यांनी नकार दिला आहे.
आज सकाळी वनाधिकाऱ्यांद्वारे रोजच्या प्रमाणे जंगलात पेट्रोलिंग सुरु होती. या दरम्यान अर्जुनी मोरगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत रामघाट बीट क्रमांक १ कक्ष क्रमांक २५४ बी असून पेट्रोलिंग करीत असलेल्या कर्मचार्यांना येथे वाघाचा मृतदेह आढळून आला. पाहणी केली असता मृतक वाघाचे नखे आणि दात गायब असल्याचे उघडकीस आले. यावरून या वाघाचे शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपीनी शिकार कश्याप्रकारे केली ह्या दृष्टीने तपास सुरु आहे.