एरंडोल (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून फार्म हाऊसवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश मारुती महाजन, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
३५ वर्षीय पिडीत तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंकुश महाजन याने आपल्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून सन 2020 पासून आतापर्यंत वेळोवेळी एरंडोल-जळगाव महामार्गावरील एका फार्म हाऊसवर नेत शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला बलात्कारासह अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप विभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.
















