परभणी (वृत्तसंस्था) रस्त्यात तरुणींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमिओला भररस्त्यात चांगलाच चोप (Road Romeo beaten) दिल्याची घटना समोर आली आहे. संतप्त झालेल्या तरुणीने बेल्टने या रोडरोमिओला धू-धू धुतला.
सेलू तालुक्यातील तळतुंबा गावात राहणाऱ्या एका मुलीची रवळगावचा रोडरोमियो मुलगा दररोज छेड काढून त्रास देत होता. सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून मुलीने मुलास भररस्त्यात गाठून पट्ट्याने चांगलाच चोप दिला. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद (incident caught in mobile camera) झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.