मेष : तुमचे अधिकारी तुम्हाला सहकार्य करतील. कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल तर वेळीच लक्ष द्या.चिकाटीने व जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. आज तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. दुपारनंतर अस्वस्थता कमी होईल.
वृषभ : कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत करावी लागेल. तुमच्या बचतीची काळजी घ्या. महत्त्वाची आर्थिक कामे व दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आज तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास टाळावेत. दुपारनंतर मनोबल कमी राहील.
मिथुन : ऑफिसमध्ये टीमवर्क करुनच तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. बौद्धिक चमक राहील.महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. आज एखाद्या सहकाऱ्याची मदत करा. अनेक कामात सुयश लाभेल.
कर्क : औषधांबाबत निष्काळजीपणा बाळगू नका. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस गुंतागुंतीचा असू शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. आज आरोग्याच्या कुरकुर सुरु राहातील. प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा विचार कराल. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. आज आळशीपणामुळे तुम्ही काम पुढे ढकलाल. आनंदी व आशावादी राहाल. कामे यशस्वी होतील.
कन्या : भविष्यातील योजनांवर पालकांचा सल्ला घ्याल. स्वत:वर काही पैसे खर्च कराल. व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आज कुटुंबातील कलह थांबतील. वरिष्ठांच्या मदतीने वातावरण निवळेल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
तुळ : ज्यामुळे अधिक धनलाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला भविष्याची चिंता कमी सतावेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आज नोकरीत तुमच्या जुन्या योजना पूर्ण कराल. भाग्यकारक अनुभव येतील. दुपारनंतर विशेष आनंदी राहाल.
वृश्चिक : व्यवसाय करणाऱ्यांना वडिलांच्या पाठिंब्याची गरज भासेल. इच्छुकांचे विवाह जमतील. कामाचा ताण राहील. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. विद्यार्थ्यांना मेहनत केल्यावर यश मिळेल. प्रवास नकोत. आरोग्य जपावे.
धनु : अधिक मेहनतीने काम केल्यास यश मिळेल. नोकरीत आज वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. बोलण्यात गोडवा ठेवा. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे निराशा कमी होईल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
मकर : तुमच्या बुद्धीने आणि विवेकाने गोष्टी सोडवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मनाचे तुम्हाला ऐकावे लागेल. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आजचा दिवस गुंतागुंतीचा असेल. प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला माहिती मिळेल. ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. धार्मिक ठिकाणी जाल. दुपारनंतर आनंदी राहाल. नातेवाईक भेटतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. प्रवासात आनंद मिळेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
मीन : कामाच्या ठिकाणी नोकरदारामुळे तणावाचा सामना करावा लागेल. महत्त्वाची कामे तुमच्यासमोर येतील. व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहाल. आज धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमावर पैसे खर्च कराल. दुपारनंतर काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.