मेष : व्यवसायात लोकांना पार्टनरशीपमध्ये सावध राहावे लागेल. अन्यथा नुकसान होऊ शकते. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. आर्थिक कामात काळजी घ्यावी. आज आपल्याला एखाद्या बाबतीत नुकसान संभवते. आज तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होईल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. सायंकाळनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : संवाद साधल्याने गोष्टी मार्गी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत राहिल, मित्राच्या मदतीने पुढे याल. मानसिकता सकारात्मक राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील. व्यवसाय व नोकरीमधील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात. प्रेम जीवनात तणाव निर्माण होतील. परंतु, तुम्ही नात्यात गोडवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुमचा प्रभाव वाढेल.
मिथुन : अनैतिक कामांपासून दूर राहा. एखाद्या व्यक्तीकडून उधारी घेतली असेल तर त्यातून तुमची सुटका होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नतेने तुम्ही आपली आजची सर्व कामे मार्गी लावू शकणार आहात. संपत्तीत वाढ होणार आहे. कामात घाई करु नका, अन्यथा नुकसान होईल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे
.
कर्क : आज कामातून तुम्हाला फायदा होईल. तुमची कीर्ती वाढू शकते. मित्रांसोबत वेळ घालवाल. मनोबल व आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींवर मात करणार आहात. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. आज तुमचे रखडलेले पैसे मिळतील. सरकारी कामे पूर्ण होण्यास मदत होईल. नवीन सुसंधी लाभेल.
सिंह : पार्टनरशीपमध्ये काम करत असाल तर जोडीदाराची साथ मिळेल. मोठी डील फायनल होऊ शकते. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मानसिक प्रसन्नता लाभेल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद राहील. काहींना आज मिष्टान्न भोजनाचा लाभ होईल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन काम करण्याची संधी मिळेल. प्रवास सुखकर होतील.
कन्या : तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. संपत्ती वाढ होईल. कौटुंबिक तणाव संपेल. तुमचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक जीवनात दुपारनंतर एखादी आंनददायी घटना घडेल. आजच्या दिवशी सभोवतालच्या वातावरणाचा आनंद घ्याल. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : आज कोणता तरी महत्त्वाचा निर्णय घ्याल. मनापासून निर्णय घ्या अन्यथा भविष्यात नुकसान होईल. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत राहाल. तुमच्यावर असणारी जबाबदारी व तुमच्यावर असणारा ताण तुम्हाला स्वास्थ्य लाभू देणार नाही. मनोबल कमी राहील. तुमच्या नेतृत्व क्षमता विकसित होतील. कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल.
वृश्चिक : कुटुंबात आज तणावाची स्थिती असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक कामे होतील. तुम्ही आज आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर विशेष सुसंवाद साधणार आहात. विवाहांचे प्रस्ताव येतील. पालकांसोबत तीर्थक्षेत्राला जाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित खर्च संभवतात.
धनु : योग्य लोकांकडून लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरीशी संबंधित प्रमोशन मिळेल. तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. तुमचा आत्मविश्वास व मनोबल वाढणार आहे. स्वास्थ्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आज तुम्ही घराच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा. प्रवासाचे योग येतील.
मकर : सासरच्या व्यक्तींना पैसे देताना सावध राहा. नात्यात दूरावा येऊ शकतो. जोडीदाराला पोटाच्या समस्या उद्भवतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन सुसंधी लाभणार आहे. प्रवासात आनंददायी घटना घडेल. नवीन कामांकरिता आज आपण विचार करू शकणार आहेत. आज व्यवसायाला उंचीवर नेण्याचा प्रयत्न कराल. ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : नात्याचे कायमस्वरुपी लग्नात रुपातंर करण्याची योजना कराल. धार्मिक कार्यात तुमचा पाठिंबा वाढेल. नवीन व्यवसायासाठी दिवस चांगला असेल. मनोबल कमी असल्याने तुम्हाला आज मानसिक अस्वस्थता राहणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्याल. शेजाऱ्यांशी वाद मिटवाल. आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभेल. कौटुंबिक मतभेद शक्यतो टाळावेत.
मीन : नवीन व्यवसाय सुरु करणे चांगले राहिल. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविली जाईल. तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होणार आहे. दुपारनंतर काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आज तुम्हाला रखडलेले पैसे मिळतील. ज्याने तुम्ही आनंदी असाल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
 
	    	
 














