मेष : मोठी रक्कम मिळाल्याने तुम्ही समाधानी असाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहिल. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. मित्र आणि कुटुंबासोबत पार्टी आयोजित कराल. भावडांच्या सहकार्याने तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील. जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्त्वाच्या कामात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल.
वृषभ : आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे अन्न खाणे टाळावे लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. नवीन लोकांशी मैत्री कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात वेगळीच ऊर्जा जाणवेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
मिथुन : आर्थिक लाभाची अपेक्षा करु शकता. काम आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी सावध राहण्याची गरज आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आर्थिक कामे आज नकोत. व्यवसायात महत्त्वाचा प्रकल्प सुरु कराल. भविष्यात त्यामुळे चांगला फायदा होईल. कुठेतरी अडकलेले पैसे आज मिळतील. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वडीलांच्या आशीर्वादाने मनातील इच्छा पूर्ण होईल. आपले मनोबल वाढीस लागेल.
कर्क : मेहनतीने काम करावे लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल कराल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सरकारी काम अडकले असेल तर अधिकाऱ्यांकडून पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टीतील मतभेद टाळा. व्यावसायिक योजनांना गती मिळेल.
सिंह : आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला वैवाहिक जीवनात बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग सफल होतील. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. कुटुंबातील सदस्याकडून भेटवस्तू मिळेल. लव्ह लाईफमध्ये नवीन ऊर्जा मिळेल. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. स्पर्धेत यश मिळवाल. आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रलंबित येणी प्राप्त होतील.
कन्या : कुटुंबात काही वाद निर्माण होतील. कुटुंबातील मोठ्यांच्या मदतीने वाद सोडवाल. कामाच्या ठिकाणी सहकार्यासोबत प्रोजेक्ट पूर्ण कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. तुमची पदोन्नती होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल. आपले विचार लोकांसमोर मांडा. घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील.
तुळ : ओळखीच्या व्यक्तीकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सासरच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. आज तुम्ही काम करताना कोणाचे तरी मत घ्या. अन्यथा गोंधळात पडू शकता. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल. लोक तुमच्या कामात ढवळाढवळ करू शकतात. आपले निर्णय स्वत: घ्या. मिळकतीच्या नव्या संधी सामोर्या येतील.
वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवेल. धैर्याने काम केल्यास यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. आज तुमच्या घरातील वातावरण बदलेल. आज तुमच्या घरातील वातावरण बदलेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. घरातल्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करून घ्या.
धनु : भविष्यात तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रेम जीवनात वेळ काढाल. जोडीदार आनंदी असेल. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्था राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. मित्राच्या मदतीसाठी पुढे याल. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल. नोकरीची संधी चालून येईल. उगाच चिडचिड करू नका. छोटे प्रवास लाभदायक ठरतील. दिवस धावपळीत जाईल.
मकर : तुम्हाला आळस सोडावा लागेल. भविष्यात अनेक समस्या उद्भवतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात कमी रस दाखवल्यामुळे उत्पन्नावर समाधानी राहावे लागेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडकलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल.
कुंभ : जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तुमचे नाते मजबूत होईल. कौटुंबिक संपत्ती वाढेल. गरजेच्या वेळी सावध राहा. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आज आपण आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. आज तुम्ही आळसावलेले असाल त्यामुळे सर्व कामे पुढे ढकलाल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. मानसिक स्वास्थ्य जपावे. धार्मिक भावना वाढीस लागेल. कौटुंबिक जबाबदार्या पार पाडाल.
मीन : तुम्हाला कामात मेहनत घ्यावी लागेल. नोकरी आणि व्यवसायात लाभ होताना दिसतील. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मार्ग मोकळा होईल. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आज तुम्ही त्रासदायक काम टाळण्याचा प्रयत्न कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. व्यावसायिक नव्या जोमाने कामे करतील. दिवसाची सुरुवात धावपळीत होईल. अचानक खर्च उदभवतील.














