मेष : कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. आपल्यावर असणारा मानसिक ताण कमी होणार आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देईल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ : आईच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सत्तेत लाभ होताना दिसतील. जोडीदारासोबत देव दर्शन घ्याल. आपले मनोबल आज कमी असणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील. राजकारणात काम करणाऱ्यांना आज यश मिळेल. काहींना अनावश्यक कामात लक्ष घालावे लागेल. काहींचा आराम करण्याकडे कल राहील.
मिथुन : काही काळ कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होतील. कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक लाभ होतील. तुमचे मनोबल वाढेल. प्रियजनांच्यासाठी वेळ देऊ शकणार आहात. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. आजचा दिवस तुमच्या कामाच्या ठिकाणी आनंद घेऊन येईल. आरोग्य सुधारणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्क : तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कोणत्याही योजनेत अडकण्याची गरज नाही. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. काहींना आपल्या सकारात्मक मानसिकतेचा फायदा होणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना आनंद लाभणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहिल. मनोबल वाढणार आहे.
सिंह : तुमच्या बिझनेसचे काही प्रोजेक्ट थांबवले असतील तर पुन्हा सुरु करा. ज्यामुळे फायदाहोईल. जिद्दीने व चिकटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. व्यवसायात नवीन संधी निर्माण होईल. व्यवसायासाठी काही नवीन प्रकल्प सुरु करण्याचा आजचा दिवस असेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागेल.
कन्या : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुरेसे पैसे कमावू शकता. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आजच्या दिवशी शुभ कार्यात वाढ होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल.
तुळ : व्यावसायिक व्यवहारात अडचणी येतील. तुमचे पैसे अडकू शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. आजची आपली सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मनोबल वाढेल.
वृश्चिक : तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या असभ्य वर्तनामुळे कुटुंबातील सदस्यांना काही समस्या येतील. आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. आज आपण कोणत्याही नवीन कामाची जबाबदारी घेण्याचे टाळावे. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनु : तुमची प्रगती पाहून विरोधक तुमची प्रशंसा करतील. सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना जुने मित्रमैत्रिणी अनपेक्षितपणे भेटतील. आजचा दिवस तुमच्यासाठी मोठे यश घेऊन येईल. आनंदी व आशावादी राहणार आहात.
मकर : तुमचे प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देतील. व्यावसायिक पार्टनरशीपमध्ये सल्ला घ्यावा लागेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण कमी राहील. आरोग्याकडे लक्ष देणार आहात. व्यावसायिक पार्टनरचा सल्ला घ्यावा लागेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे
कुंभ : व्यवसायात तुम्हाला काही नुकसान होईल. दैनंदिन खर्च तुम्ही भागवू शकता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. जिद्दीने कार्यरत रहाल.