मुंबई (वृत्तसंस्था) भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. यानिमित्तानं दुखवटा म्हणून राज्य सरकारनं (state government) आज राज्यात सार्वजनिक सुट्टी (public holiday) जाहीर केली आहे. लतादीदी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारनेही (central government) राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान लतादीदी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (सन १९८१चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. राज्य सरकारने दुखवटा म्हणून सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या सार्वजनिक सुट्टीमुळे प्रशासकीय कामकाज, शाळा-महाविद्यालये, बँका आणि इतर आस्थापने बंद असणार आहेत.
महापालिकेचं ट्विट
भारतरत्न लता मंगेशकर ह्यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने आज सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये आज बंद राहतील.
मुंबई उच्च न्यायालयही बंद
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील इतर न्यायालयांना आज सुट्टी असेल.