मेष : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. छंद जोपासायला वेळ काढाल. आवडत्या साहित्यात रमून जाल. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल.
वृषभ : आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. स्वछंदीपणे दिवस घालवाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल.
मिथुन : आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल.
कर्क : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. नोकरी – व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका.
सिंह : आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. आवडत्या गोष्टींत अधिक रमून जाल. कमीपणा घ्यायला घाबरू नका. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. नवीन मित्र जोडले जातील.
कन्या : आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कामाची योग्य दिशा ठरवा. कल्पनेत रमून जाऊ नका. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. बोलतांना तारतम्य बाळगा.
तूळ : आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील.चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल.
वृश्चिक : आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कर्तुत्वाला वाव देता येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल.
धनू : आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल.
मकर : आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा. अचानक धनलाभाची शक्यता.
कुंभ : आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. अति आवश्यक असेल तरच बाहेर पडावे. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
मीन : आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण – घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. आततायीपणे वागून चालणार नाही. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत. (Today Rashi Bhavishya, 12 July 2023)