मेष : दिवसाची सुरुवात अनुकूल घटनांनी होईल. मनात आनंदी विचार राहतील. मित्रांच्या भेटी होतील. नोकरीत कामाचा ताण राहील. पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.
वृषभ : दिवसाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. एखाद्या कामानिमित्त धावपळ होईल. मनावर संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रवासात सतर्क राहा. कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
मिथुन : आर्थिक व्यवहार जपून करा. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.
कर्क : दिवसाची सुरुवात थोडी संथ गतीने होईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. मात्र, दुपारच्या सत्रात अडचणी दूर होतील. योग्य सल्ला मिळेल. फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारच्या आत आटोपून घ्या. कामाचा ताण आटोक्यात आणण्यासाठी धडपड सुरू राहील. त्यातून चिडचिड होऊ शकते. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणींवर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.
कन्या : ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. नोकरी, व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. मुलांची काळजी घ्या. धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.
तूळ : कामात सतत कार्यरत [राहाल काहींना कामानिमित्त फिरणे होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो हे लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करा. जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.
वृश्चिक : व्यापारात प्रगती होईल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. मनात काळजीचे विचार राहतील. मात्र, जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. मुलांना यश मिळेल. भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.
धनू : प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. उत्साहाने कामे ‘कराल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात काही अनपेक्षित अडचणी येतील, नोकरीत चांगली परिस्थिती राहील. घरात एखादी गुप्त विता लागून राहील. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.
मकर : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. मनात शंका न ठेवता कामे करा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण सामान्य राहील. मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ : महत्त्वाची कामे दुपारच्या सत्रात आटोपून घेतलेली बरी. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. वसुलीसाठी सकाळच्या सत्रात प्रयत्न करा. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च कराल. सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.
मीन : घरात आनंदी वातावरण राहील. लोकांची सतत ये-जा चालू राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. उसने पैसे देताना विचार करून द्या. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीची चांगली मदत मिळेल. व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे. (Today Rashi Bhavishya, 13 April 2023)