मेष : आजचा दिवस आगळा – वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. घरातच मन रमेल. घर टापटीप ठेवाल. जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. चटपटीत पदार्थ खाल. दिवस मजेत घालवाल.
वृषभ : आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. मित्रांशी गप्पा माराल. जवळचा प्रवास कराल. नवीन गोष्टींची माहिती जमवाल. भावंडांशी सलोखा वाढेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.
मिथुन : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश – कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. पत्नीचा सहवास हवाहवासा वाटेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. फार थंड पदार्थ खाऊ नयेत. काही कामे उगाचच अडकून पडतील. स्वप्नात रमून जाल.
कर्क : आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. उगाचच घाई-घाई करू नका. आपल्या मर्जीने वागाल. बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका. चंचलतेवर मात करावी. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
सिंह : आज कुटुंबातील वातावरण वाद – विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. विचारात वाहून जाऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. हातातील कला सर्वांसमोर सादर करता येईल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. भागीदारीत नफा मिळेल.
कन्या : आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. इतरांचा विश्वास संपादन करावा. हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.
तूळ : ज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. गैरसमजाला मनात जागा देऊ नका. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. गृहशांती जपावी लागेल. मुलांची मते जाणून घ्यावीत.
वृश्चिक : एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही व मित्रवर्ग यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. धाडस करतांना सतर्क राहावे. शाब्दिक चकमक टाळावी. हातापायांना किरकोळ इजा संभवते. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराचे सौख्य वाढीस लागेल. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील.
धनू : आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. बाहेर फिरताना मौल्यवान गोष्टी सांभाळाव्यात. अनाठायी खर्च होऊ शकतो. अपयशाने खचून जाऊ नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा.
मकर : आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर – सट्टा ह्यात धन लाभ होईल. अडथळ्यातून मार्ग काढावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आततायीपणे निर्णय घेऊ नका. इतरांच्या मनाचा विचार करावा. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल.
कुंभ : आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी – व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. चित्त एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करावी. गरज नसतांना खर्च करू नका. आपली संगत तपासून पहावी. जबाबदारीची जाणीव ठेवावी.
मीन : आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. काही कामे वेळ घालवतील. उगाचच खिळून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील भीती बाजूला सारावी. स्वत: साठी वेळ बाजूला काढावा. उष्णतेचा त्रास जाणवेल. (Today Rashi Bhavishya, 14 March 2023)