मेष : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. कौटुंबिक सौख्य चांगले राहील. बोलण्यातून इतरांवर छाप पडाल. गायन कलेला चांगला दर्जा मिळेल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधावा.
वृषभ : आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या – पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. नटण्या मुरडण्याची हौस भागवाल.
मिथुन : आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांची उत्तम साथ लाभेल. सहकुटुंब दिवस मजेत घालवाल. सरकारी कामात वेळ जाईल. वाचनाची आवड पूर्ण कराल.
कर्क : आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. स्त्रियांशी मैत्री वाढेल. नवीन गोष्टींचे आकर्षण वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. मनातील रुक्षपणा काढून टाकावा.
सिंह : आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. इतरांवर तुमची छाप पडेल. चंचलतेवर मात करावी. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो. जोडीदाराची व्यवहारकुशलता दिसून येईल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल.
कन्या : आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील.आवडते ग्रंथ गोळा कराल. धार्मिक कामात सहकार्य कराल. आधिभौतिक गोष्टींकडे कल राहील. शैक्षणिक कामे पूर्ण होतील. काही नवीन अनुभव गाठीशी बांधाल.
तूळ : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. रेस सट्टा यांतून धनलाभ संभवतो. नातेवाईकांची मदत घेता येईल. कामे वेगात पूर्ण करता येतील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. फसवणुकीपासून सावध राहा.
वृश्चिक : आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. गैरसमजुतीतून मानसिक त्रास वाढू शकतो. गरज असेल तरच प्रवास करा. व्यवसाय वृद्धीचा विचार करा. भावंडांचे प्रश्न समोर येतील. हातून एखादे सत्कार्य घडेल.
धनू : आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. मनाची संवेदना दाखवाल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. जुन्या कामातून फायदा संभवतो.
मकर : आज आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. आर्थिक व्यवहारात सतर्कता दाखवावी. उधार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. उगाचच चीड-चीड करू नये.
कुंभ : आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. मनातील निराशा बाजूस सारावी. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. अती भावनाशील होऊ नका. ध्यानधारणेत वेळ घालवाल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मीन : आज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल. कामात उगाचच अडकून पडल्यासारखे वाटेल. लबाड लोकांपासून दूर राहा. अती काळजी करू नका. सार्वजनिक कामात मदत कराल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. (Today Rashi Bhavishya, 17 March 2023)