अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण सिम येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी विहिरीत आढळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील लोण सिम येथील प्रमोद शांताराम बोरसे (वय ३५) हा तरुण १५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता शेतात जाण्याचे सांगून घरातून निघाला. मात्र, रात्री उशिरापर्यंत परत न आल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. १६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी त्याची चप्पल भिकूबाई शांताराम बोरसे यांच्या शेताजवळ विहिरीच्या पायरीवर आढळली. गावकऱ्यांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता, प्रमोद बोरसेचा मृतदेह आढळला. त्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात एकात्मता मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास विनोद साळी हे करत आहेत.