मेष : आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. कामातील उत्साह व जोम वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कागदपत्रांची नीट छाननी करावी. आवडी निवडीबाबत दक्ष राहाल.
वृषभ : व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. कामात अधिक आवडीने रस घ्याल. तोंडात साखर ठेवून वागाल. हौसेखातर खर्च कराल. करमणुकीचे कार्यक्रम आखाल. अपूर्ण कामे पूर्ण कराल.
मिथुन : आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी – व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा. मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल. बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल. संपर्काचा फायदा करून घ्याल.
कर्क : आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची कमाई वाढेल. लेखक वर्गाला चांगला फायदा होईल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल. तुमचे कसब कामाला लावाल. कामात स्त्री वर्गाची मदत होईल.
सिंह : आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या – फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल. कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.
कन्या : आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. भागीदारीत नवीन योजना आखाल.
तूळ : आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणेआपणास आवडेल. चांगल्या बातम्या मिळतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा. देणी भागवता येतील.
वृश्चिक : आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. एककल्ली विचार करू नका. अती आग्रह बरा नव्हे. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल.
धनू : आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.
मकर : नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील. डोळ्यास त्रास होण्याची शक्यता आहे. उष्णतेचे विकार संभवतात. पचनास हलके पदार्थ खावेत. डोके थंड ठेवावे लागेल. फार काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. उगाचच चिडचिड करू नये.मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल. व्यापार – व्यवसायात प्रगती होईल.
कुंभ : आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा आनंद घेता येईल. हातातील अधिकाराचा वापर करता येईल. घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल. चैनीची आवड जोपासाल.
मीन : आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. गप्पांमध्ये रमून जाल. हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल. सामाजिक गोष्टीत हातभार लावाल. मित्रांची नाराजी गोडीने दूर करावी. (Today Rashi Bhavishya, 25 March 2023)