मेष : आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. बौद्धिक ताण जाणवेल. जमिनीच्या व्यवहारात अडकू नका.
वृषभ : आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी. अनाठायी खर्च करू नये. तरुण वर्गाची मते विचारात घ्याल. कामे वेळेत पार पडतील.
मिथुन : आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. चांगल्या संगतीत दिवस जाईल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क : आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल. विशिष्ट धोरण ठेवून वागाल. बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा.
सिंह : आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मानसिक स्थैर्य जपावे. काही गोष्टींत कंजूषपणा दाखवाल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. अती विचार करू नये. भागीदारीतून चांगला फायदा होईल.
कन्या : सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापारात लाभ संभवतो. जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
तूळ : आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. छंद जोपासला वेळ काढाल. कौटुंबिक बाबतीत शांतता ठेवावी. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.
वृश्चिक : सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील. घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत करावी लागेल.
धनू : आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार – विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा. जवळचे मित्र भेटतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. कौटुंबिक खर्चाचा आकडा पुनर्विचारात घ्या.
मकर : आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.
कुंभ : आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका. आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात. अघळ-पघळ बोलणे टाळा.
मीन : आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रमंडळींची नाराजी दूर करावी. वादाच्या मुद्दयात अडकू नका.(Today Rashi Bhavishya, 30 March 2023)