मेष : महत्त्वाची कामे आपण सायंकाळच्या आत आटोपून घ्या. त्यानंतर विरोधकांकडून तुमच्या कामात अडथळे आणले जाऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. सरकारी कामे मार्गी लागतील. कामातील बदल जाणून घ्यावेत. मौल्यवान वस्तू जपून ठेवाव्यात. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ : दिवसाच्या सुरुवातीला नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र आपण नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यास कामे पूर्ण होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ देणे शक्य होईल. जीवनाकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. साहित्याची आवड जोपासता येईल. भावंडांना बाहेर गावी जाण्याचा योग येईल. मैत्रीतील आपुलकी वाढेल. फार दूरचे विचार करू नका.
मिथुन : कामात उत्साह राहील. सतत कार्यरत राहाल. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. प्रवास घडून येतील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. क्षणिक सौख्याचा आनंद घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने मार्गक्रमण कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. कमिशनचा लाभ उठवावा.
कर्क : ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. कामात उत्साह राहील. स्त्री वर्गाचा सहवास लाभेल. नवीन मित्रा जोडले जातील. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.
सिंह : हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. त्यामुळे मन आनंदित राहील. आर्थिक आवक चांगली राहील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल. महिलावर्ग मनाजोगी खरेदी करेल. चांगले साहित्य वाचनात येईल. जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
कन्या : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. तोपर्यंत फार दगदग न करता कामाचे नियोजन करून ठेवा. योग्य सल्ला मिळेल. व्यवसायात यशस्वी व्हाल. चारचौघांत तुमची कला सादर करता येईल. योग्य विचारांची जोड घ्यावी. धार्मिक साहित्य वाचाल. इतरांना मनापासून मदत कराल. मनात नवीन कल्पना रुजतील.
तूळ : महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. ग्रहमानाच्या अनुकूलतेचा वेळीच फायदा घ्या. प्रवासात काळजी घ्या. अनावश्यक खर्चाला आवर घाला. अचानक धनलाभ संभवतो. लॉटरीचे तिकीट घ्याल. घरगुती प्रश्न समजून घ्यावेत. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : कामांना गती मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. महत्त्वाचे निरोप येतील. पत्नीचे प्रेमळ सौख्य लाभेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. कामातून आत्मिक समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धीचा मार्ग आखावा. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
धनू : तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. हातून समाजसेवा घडेल, मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. बोलण्याच्या भरात नवीन जबाबदारी अंगावर घ्याल. हाताखालील लोकांकडून कामे करून घ्याल. जुगाराची आवड जोपासाल.
मकर : महत्त्वाची कामे सायंकाळच्या वेळी हाती घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका, वाहन जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. पित्ताचा विकार जाणवेल. कामाचा फार ताण घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. स्वत: मध्ये काही बदल करून पहावेत. कामातील अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावेत.
कुंभ : महत्त्वाची कामे सायंकाळच्या आत पूर्ण करा. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. सामाजिक बांधीलकी जपावी. वादावादीत सहभाग घेऊ नका. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. धाडसाने कामे पूर्ण कराल. तुमची हिंमत वाढीस लागेल.
मीन : दिवसाची सुरुवात थोडी चाचपडत होईल. मात्र ग्रहमान हळूहळू अनुकूल होईल. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर करा. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचा रोष वाढवून घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल. (Today Rashi Bhavishya, 4 April 2023)