मेष : फार दगदग होईल अशी कामे करू नका. कामातून वेळ काढून आराम करा. तब्येतीची काळजी घ्या. आपल्या योजना इतरांना सांगत बसू नका. कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. तुमच्यातील उद्योगशीलता वाढेल.
वृषभ : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. चांगल्या बातम्या कळतील. मुलांची प्रगती होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. अवाजवी कामे अंगावर घेऊ नयेत. मेहनतीला मागेपुढे पाहू नका. उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. खर्च आटोक्यात ठेवावा.
मिथुन : नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. कामाचे स्वरूप बदलू शकते. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. बिनधास्तपणे वागणे ठेवाल. पत्नीच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल. नियम बाह्य कामे करू नका. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
कर्क : व्यवसायात भरभराट होईल. सतत कामे करीत राहाल. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मित्र परिवारात वाढ होईल. मौल्यवान वस्तू लाभतील.
सिंह : ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामांत सफलता मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. दान धर्माचे पुण्य पदरी पडेल. स्पर्धकांवर मात करता येईल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.
कन्या : मनात आनंदी विचार राहतील. अडचणी दूर झाल्यामुळे व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल. लोक तुमची प्रशंसा करतील. लोकाचे चांगले सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. तब्येतीची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.
तूळ : कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. महत्त्वाच्या कामात विलंब होईल. काही अडचणी येतील. मनात काळजीचे विचार राहतील. लोकांबद्दल तुमच्या मनात शंका राहतील. व्यावसायिक प्रवास करावा लागेल. स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी विचार विनिमय करावा.
वृश्चिक : आपल्या योजना गती घेतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सहकारी, मित्र-मैत्रिणी यांची चांगली साथ राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. हित शत्रूंचा त्रास संभवतो. कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. स्वभावात काहीसा हटवादीपणा येईल. नवीन आव्हान पेलाल.
धनू : नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. त्यामुळे चांगली संधी मिळेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.
मकर : अडचणी दूर झाल्यामुळे मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल, सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. काही वेळ शांत राहणे उत्तम. फार उतावीळपणा करू नका. उष्णतेचे विकार संभवतात. कामातील उत्साह वाढीस लागेल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल.
कुंभ : आर्थिक प्राप्त प्रमाण चांगले राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. सामुदायिक वादात अडकू नका. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. हातापायांना किरकोळ इजा संभवते.
मीन : नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मात्र कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. किरकोळ कारणावरुन वाद टाळा. भेटवस्तू मिळतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मित्रांची नाराजी दूर करावी. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. (Today Rashi Bhavishya, 5 April 2023)