मेष : धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनसाथीवी चांगली साथ राहील. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. सांपत्तिक दर्जा सुधारेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात हिरीरीने भाग घ्याल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल.
वृषभ : आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. विरोधकाच्या कारवाया सुरु राहतील. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. कपडे-लत्ते खरेदी कराल. महिला नटण्या मुरडण्याची हौस भागवतील. चारचौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल.
मिथुन : चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. पैसे मिळतील; पण शिल्लक पडणार नाही. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. तुमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील.
कर्क : धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मित्र मंडळीचे सहकार्य मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. वाहनसुख मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
सिंह : अनावश्यक दगदग करू नका. प्रवासाचे नीट नियोजन करा, व्यवसायात मेहनत करावी लागेल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सुखसोयी वाढवून मिळतील. तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत.
कन्या : आर्थिक आवक चांगली राहील, मात्र त्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात अडचणी येतील. आर्थिक व्यवहार जपून करा. आवडते साहित्य वाचाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.
तूळ : एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात जपून पावले टाका. काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. भागिदारी व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कमी श्रमातून धनलाभ संभवतो. जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
वृश्चिक : व्यवसायात यशस्वी व्हाल. मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. नवीन ओळखी होतील. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. स्वकर्तृत्वावर कामे मिळवाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.
धनू : ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. चांगल्या बातम्या कळतील. मित्रांच्या भेटी होतील, त्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मकर : नोकरीत नवीन बदल होतील. कामाचा ताण वाढेल. सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. घरी पाहुणे मंडळींचे आगमन होईल. घरात वाद हे होणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांचे कौतुक होईल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. रेस जुगारातून धनलाभ संभवतो. संभाषणाची आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.
कुंभ : आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा. मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल.
मीन : महत्त्वाच्य कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील, भावडांशी सख्य राहील. एकांगी विचार करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. (Today Rashi Bhavishya, 7 April 2023)
















