मेष : दिवसाच्या सुरुवातीला कामाची गती मंद राहील, आश्वासने वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे व्यावसायिक संबंध बिघडू शकतात. कोणत्याही कामाबाबत कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही, परंतु ज्या कामात तुम्ही गुंतवणूक कराल, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावा लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.
वृषभ : नोकरी व्यवसायातून मधूनमधून आर्थिक लाभ होत असल्याने आर्थिक संबंधित अडचणी काही प्रमाणात दूर होतील. काही गुप्त चिंता मनाला त्रास देऊ शकतात, परंतु लवकरच तुमची या समस्येतूनही सुटका होईल. घरातील सुखी राहण्यासाठी महिला सहकार्य करतील. कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.
मिथुन : तुम्ही स्वावलंबी होऊन तुमचे काम करा. पैशांबाबत भागीदारांमध्ये मतभेद होऊ शकतात. तुमची वागणूक गोड असली तरी लोक तुमचा उपयोग फक्त कामे करण्यासाठीच करतील. घरातील कार्यक्षेत्राचा राग बाहेर काढल्याने घरातील वातावरणही विनाकारण बिघडू शकते. इतरांवर विसंबून राहू नका. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कर्क : आज जे काही काम करायचे ठरवले आहे, त्यात काही गोंधळ होऊ शकतो. तरीही तुम्ही धीर सोडणार नाही, सतत प्रयत्न केल्याने कामात सुधारणा होईल आणि फायदा होण्याची शक्यता आहे. जास्त सूर्यप्रकाशामुळे शारीरिक शिथिलता निर्माण होईल. प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.
सिंह : सकाळी लवकर कामात गुंतल्याने धनलाभाचे योग बनतील. बरीचशी कामे थोड्या मेहनतीने होतील. कठीण कामात अधिकारी सहकार्य करतील. आज बनवाबनवी करून कठीण परिस्थितीतही तुम्ही काम करून घ्याल. मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे.
कन्या : आजचा दिवस व्यर्थ धावपळीत जाईल. शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, तरीही कामे अनिच्छेने करावी लागतील. आज तुम्ही कितीही दान आणि परोपकार केलात तरी तुम्ही लोकांना सुखी ठेवू शकणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. कमिशनमधून लाभ संभवतो.
तूळ : सांध्यांमध्ये वेदना असू शकतात, ज्यामुळे कामांमध्ये विलंब होऊ शकतो. व्यवसायाच्या मंद गतीमुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम होऊ शकतो. दुपारनंतर स्थिती सुधारेल. नोकरदार लोकांना अचानक धनलाभ झाल्याने आनंद होईल. मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहिल्याने मन लावून काम कराल, पण कोणाचा तरी हस्तक्षेप मनाला त्रास देऊ शकतो. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, एकाग्र राहा आणि तुमच्या कामात मग्न राहा, पैसा आणि सन्मान दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.
धनू : पैशाच्या मागे धावण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा पैशांसोबतच मान सन्मानही गमवाल. जुनी कामे दुपारपूर्वी पूर्ण झाल्यावर तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. अचानक पैसे मिळून दैनंदिन खर्च भागेल. यानंतरचा काळ प्रतिकूल असेल. मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.
मकर : लोक तुमच्याशी भावनिक संबंध निर्माण करतील पण गरजेच्या वेळी कोणीही पुढे येणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या असभ्य वर्तनामुळे तुम्हाला स्वतःवर जास्त अवलंबून राहावे लागेल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे, शक्य असल्यास ते आज टाळा. कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अतिविचार करू नका.
कुंभ : आज सरकारी काम काळजीपूर्वक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. कौटुंबिक संबंधांबाबत प्रामाणिक राहा. तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. मानसिक दबावामुळे आरोग्यात चढ-उतार होऊ शकतात. दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी केल्या जातील.
मीन : व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित महिलांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत मिळू शकते. सामाजिक कार्यात रस नसला तरी सहभागी व्हावे लागेल, मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांचे मार्गदर्शन आज प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल. मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणिवेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. (Today Rashi Bhavishya, 7 June 2023)