मेष : नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांसाठीआजचा दिवस संमिश्र राहील. तुमच्या व्यवसायात आज मनासारखा नफा मिळणार नाही. आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ : आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. आज तुमचा एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागण्यासाठी येऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांचा सल्ला घ्यावा लागेल.आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. अतिरिक्त काम आणि सहकाऱ्यांची वागणूक यामुळे तुमचं कामात मन रमणार नाही.
मिथुन : आज तुम्हाला शेअर्समध्ये मोठा नफा मिळू शकतो. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खास असेल. आज जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे जर असे घडत असेल तर काळजीपूर्वक विचार करा. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.
कर्क : मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आज त्यावर पैसे खर्च करणे टाळा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल.
सिंह : आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. आज तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील.
कन्या : जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिकांसाठीही आज दिवस चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र – मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात.
तूळ : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार दिसतील. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.
वृश्चिक : आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ राहील. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील.
धनु : आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकेल.
मकर : आज तुमच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचे अनावश्यक खर्च वाढू शकतात. दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल.आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कुंभ : दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी. आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल.आज तुम्ही कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नुकसान आणि अडचणीत येण्याची शक्यता आहे. मानसिक तणावामुळे डोकेदुखी सारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
मीन : आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवाद जास्त वाढू देऊ नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये आधीच पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.