मेष : जर तुम्ही ओळखीच्या व्यक्तीकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज ते तुम्हाला सहज मिळेल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.
वृषभ : संध्याकाळी तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकता. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा लागेल.विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कष्टाचे पूर्ण चीज झाले नाही तरी आपण पुढेच जात राहाल. घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.
मिथुन : आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमांवर पैसे खर्च करू शकता. तुम्ही तुमचा पैसा सध्या आहे तिथेच सोडून द्यावा आणि इतरत्र कुठेही गुंतवू नये. शक्यतो प्रवास टाळा. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. महागड्या वस्तू सांभाळून ठेवा.
कर्क : आज तुम्हाला तुमच्या भावाची मदत मिळू शकते. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येतील.आर्थिक लाभ व समाजात आदर – सत्कार मिळेल. विरोधकांना पराभूत कराल. आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा.
सिंह : आज तुम्हाला जास्त पैसे खर्च करणे टाळावे लागेल कारण असे केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात सुख शांती नांदेल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. नातेवाईक भेटतील. निर्धारित कामात यश मिळेल.
कन्या : नोकरदारांना आज कोणत्याही वादात पडणे टाळावे लागेल, अन्यथा त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. आळसात दिवस घालवू नका.
तूळ : आज तुमचा कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही खाजगी नोकरीच्या शोधात असाल तर थोडा वेळ थांबा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज अडचणींमुळे मनःशांती लाभणार नाही. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.
वृश्चिक : आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. नोकरी – व्यवसायात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रांसह सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या.
धनू : भाऊ-बहिणींमध्ये काही वाद सुरू असतील तर आज तुम्ही कुटुंबातील सदस्याच्या मदतीने ते सोडवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार – व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. नवीन ओळख होईल.
मकर : राजकारणाशी निगडित लोकांना आज जाहीर सभा घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचा पाठिंबाही वाढेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका.
कुंभ : आज, तुमच्या व्यस्त वेळापत्रकातही, तुम्ही तुमच्या प्रेम जीवनासाठी वेळ काढू शकाल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. मनातील निराशा झटकून टाका. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल.
मीन : कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी साठी अनुकूलता लाभेल. क्षुल्लक वादापासून दूर रहा. नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. आज तुम्हाला कोणतीही जमीन किंवा इमारत खरेदी करायची असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.