मेष : आज तुम्हाला एकामागून एक आनंदाच्या नव्या बातम्या मिळणार आहेत. आज आपण विशेष मानसिक प्रसन्नतेने कार्यरत राहणार आहात. आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. आपल्यावर असणारा कामाचा ताण कमी होणार आहे. आपण आज अधिक ऊर्जावान असणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. विचार न करता गुंतवणूक करू नये, तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
वृषभ : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश मिळवणार आहात.व्यावसायिकांनाही गती मिळेल, ज्यामुळे त्यांच्या अनेक समस्या दूर होतील. दैनंदिन कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन कल्पनांचा विचार कराल आणि चांगलं यश मिळवाल.
मिथुन : आज व्यवसायात मोठे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक कामास आज आपणाला अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात आपण अधिक आनंदी राहणार आहात. मनोबल वाढणार आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली एखादी चूक आज तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते. आजचा दिवस आपणाला उत्साहवर्धक असणार आहे. तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आपल्यावर असणारा ताण कमी होईल. तुमची मानसिकता सकारात्मक होणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. नोकरीच्या शोधात असलेले लोक नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील.
सिंह : भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. मनोरंजन व करमणुकीकडे आज आपले विशेष लक्ष असणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आज भागीदारीत एखादे काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. दैनंदिन कामात आपल्याला अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात काळजी हवी. आरोग्याच्या कारणास्तव कोणत्याही प्रकारचा प्रवास करू नका.
कन्या : आजचा दिवस अचानक लाभाचा दिवस असेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या गाठीभेटी घेता येणार आहेत. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच जोखीम उचलली तर तर तुमचे नुकसान होऊ शकते. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो
तुळ : आज तुमच्या वैवाहिक संबंधात गोडवा राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मानसिक उत्साह विशेष असणार आहे. आजचा दिवस अनुकूल असणार आहे. प्रवास आनंददायी होणार आहेत. . तुम्ही गुंतवणूक योजनांमध्ये काही पैसेही गुंतवू शकता. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना भविष्यातील नियोजनात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. अचानक लाभ मिळाल्याने तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही.
वृश्चिक : आजच्या दिवशी तुम्हाला खूप खर्च करावा लागणार आहे. तुमचे मनोबल वाढणार आहे. काल असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. कायदेशीर प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. तुम्ही आपल्या मताबद्दल आग्रही असणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवी दिशा सापडेल.तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात.
धनु : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. दैनंदिन कामातील अडचणी आपल्याला अस्वस्थ करणार आहेत. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमचे आज कोणतेही नियोजन सफल ठरणार नाही, त्यामुळे तुमचे मन नाराज राहील. आज प्रवासाला निघावे लागेल. परंतू प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला क्षणिक रागाच्या सवयीवर नियंत्रण ठेवावं लागेल.
मकर : तुमच्या जवळचे काही लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. प्रवासात विशेष उत्साह राहील. तुम्हाला अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाला निघावे लागेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.
कुंभ : आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. एखादी घटना आज आपल्याला अस्वस्थ करणार आहे. अनावश्यक त्रास व विलंब अनुभवणार आहात.आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी हवी. खर्च वाढतील. तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.
मीन : आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील.प्रिय व्यक्ती भेटल्याने आनंदी होणार आहात. तुमची बौद्धिक छाप पडेल. दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार पडणार आहेत. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल.