मेष : आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. आज लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगली कमाई होऊ शकते. प्रवासातूनही शुभ परिणाम मिळू शकतील. या काळात नावलौकिक होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आज आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन व मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्हाला कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालविता येऊ शकतो.
मिथुन : अनेक दिवसांपासून सुरू असलेला मानसिक तणाव दूर होऊ शकतो. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. विरोधकां बरोबर वाद – विवाद करणे उचित ठरणार नाही. प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस नात्यात गोडवा वाढवणारा असेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क : शैक्षणिक आणि स्पर्धा क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत. आज तुम्ही बोलण्याऐवजी ऐकण्याकडे जास्त लक्ष द्यावे. यावरून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी कळू शकतात.
सिंह : व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक व सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल. व्यावसायिकांना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या : व्यापार – व्यवसायात प्रतिस्पर्धी व विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्या कडून चांगल्या बातम्या समजतील. आज समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. वैवाहिक जीवनात सुखाची अनुभूती मिळू शकते. आज, अनावश्यक गुंतागुंतांपासून दूर, तुम्ही तुमचा मोकळा वेळ मंदिरात घालवाल.
तूळ : प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद होईल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबरच आज सर्व कामे कराल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. त्यामुळे पैशाची कमतरता दूर होऊ शकते.
वृश्चिक : शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
धनु : प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल. व्यापार – व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक कारणांमुळे कामाच्या ठिकाणी कोणाशी भांडण देखील होऊ शकते. आज तुम्ही केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक होईल. वाहतुकीच्या कामाशी संबंधित लोकांना फायदा होईल.
मकर : कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. तुमचे प्रतिकूल वागणे तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना त्रास देईल. आज व्यवसाय संथ असल्याने पैशाची आवक कमी राहील. दुपारनंतर अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ : आज मुले अभ्यासापेक्षा खेळावर जास्त लक्ष देतील. धार्मिक स्थळी कापसाच्या विड्यांचे दान करा, तुम्हाला प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील. आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तूंची प्राप्ती व धनप्राप्ती होईल. सार्वजनिक क्षेत्रातही तुमची प्रतिमा सुधारेल आणि लोक तुमची मागून स्तुती करतील.
मीन : महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट – कचेरीतील प्रकरणे ह्या पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आर्थिक देवाण – घेवाणीसाठी अनुकूल नाही. पैशाची आवकही आज कमी होईल; कर्ज घेण्याची गरज पडू शकते, परंतु कर्ज न घेणे चांगले आहे.
(टीप : ही केवळ एक माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून क्लिअर न्यूज कोणताही दावा करत नाही.)