मेष : आज आईकडून तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य राहील, आज आईने एखादे काम सांगितले तर ते टाळू नका शत्रुपिडा नाही. आज तुम्ही घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आज तुम्हाला पाठदुखीमुळे खूप त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही काही वेळ थेट बेडवरच आराम करा
वृषभ : आज सायंकाळी शेजाऱ्यांशी काही वाद झाला तर शांत राहणे तुमच्यासाठी योग्य राहाणार आहे, तसेच आज तुमची भाषा गोड ठेवा. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आज विद्यार्थ्यांना यशप्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. पायांमध्ये दुखणे आणि सूज येण्याची तक्रार होऊ शकते, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य तपासणी करून घ्यावी.
मिथुन : आज जर एखादे काम टळणार असेल, तर असे काम धैर्याने पूर्ण करावे लागणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज सायंकाळी डोकेदुखी, अंगदुखीची तक्रार जाणवेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमची कोणाशी मैत्री असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करू नका, जसे आहात तसे रहा. केवळ दिखावा करण्यासाठी पैसे खर्च करू नका.
कर्क : आज तुम्हाला विविध मार्गातून उत्पन्न मिळेल, पण तुम्हाला या संधी ओळखाव्या लागतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. तुम्ही आज पार्टीच्या शॉपिंगसाठी खरेदी कराल. प्रवास शक्यतो टाळावेत. तुमची कोणाशी मैत्री असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करू नका, जसे आहात तसे रहा. केवळ दिखावा करण्यासाठी पैसे खर्च करू नका.
सिंह : आज जोडीदाराची मदत मिळेल, जेणे करून तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आज तुम्हाला वरिष्ठांच्या रागाला तोंड द्यावे लागेल. नवीन परिचय होतील. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील महिलांचा पूर्ण आदर करा आणि शक्य असल्यास सर्व सहकाऱ्यांचा पूर्ण आदर करा.
कन्या : आज जर तुम्ही मित्राच्या सल्ल्याने गुंतवणूक करत असाल तर आज पैसे बुडण्याची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आज कार्यक्षेत्रात एखादी व्यवहार पूर्ण करताना अधिक कष्ट घ्यावे लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसाय करणार्या लोकांबद्दल बोलायचे तर, हार्डवेअरचा व्यवसाय करणार्यांना आज थोडे सावध राहावे लागेल.
तुळ : आज एखदा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्यासाठी एखादा भागीदार मिळू शकतो आणि त्याच्यासाठीही हा दिवस चांगला असेल. आरोग्य उत्तम राहील. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला तुम्हाला आज दुप्पट लाभ मिळेल. गुरूकृपा लाभेल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही व्यवहार विचारपूर्वक करा. आज तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खुश असतील.
वृश्चिक : आज व्यवसायानिमित्त प्रवासाला जाण्याची संधी मिळाली तर आवश्य जा, त्यातून लाभ होईल. वादविवाद टाळावेत.अन्यथा एखादी गोष्ट बिघडू शकते आणि जोडीदार नाराज होऊ शकतो. भागीदारी व्यवसायातील निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. तुम्ही तुमच्या व्यवसायात छोटी गुंतवणूक करून अधिक पैसे कमवू शकता. सध्या मोठ्या गुंतवणुकीकडे जास्त लक्ष देऊ नका.
धनु : सासरच्या बाजूने कोणाशी वाद असतील, तर जोडीदाराच्या मदतीने हा वाद सुटेल. मन आनंदी व आशावादी राहील. कुटुंबातील सदस्याच्या विवाहातील अडचणी दूर होतील. प्रवास सुखकर होतील. आज तुम्ही थोडे उदास असाल. आज तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार तुमचे पैसे खर्च करा, अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
मकर : खासगी नोकरीतील लोकांनी आज फक्त कामात लक्ष द्यावे, अन्यथा वरिष्ठ अधिकारी तुमच्या बढती आणि वेतनवाढीत अडचणी आणू शकतात. कोणालाही जामीन राहू नका. आज जर एखादी मालमत्ता खरेदी करणार असाल किंवा विकणार असाल तर त्याच्या सगळ्या बाजू तपासून पाहा. दुग्धव्यवसाय करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या ग्राहकांकडून काही तक्रारी येऊ शकतात. त्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता जपा.
कुंभ : शत्रू हा तुमच्या मित्राच्या रूपातही असेल, हे लक्षात ठेवा, त्यामुळे शत्रू ओळखा आणि त्यापासून सावध राहा. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आज सायंकाळचा वेळ आईवडिलांच्या सेवेत घालवाल. आज तुम्ही घराबाहेर पडताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुमच्या पायाला दुखापत होऊ शकते.
मीन : आज सायंकाळी कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तणावाचा सामना करावा लागेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज तुम्ही कुटुंबातील लहान मुलांच्या इच्छा पूर्ण कराल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचा तणाव असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा.
















