मेष : आर्थिक स्थिती मध्यम असेल, परंतु तरीही तुम्ही तुमचे दैनंदिन खर्च भागवू शकाल. थोडक्यात तुमचा आर्थिक प्रश्न आज सुटेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आज नोकरीच्या ठिकाणी तुमची कीर्ती वाढेल.
वृषभ : आज एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या मदतीने तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान आणि अनुभव मिळेल.
मिथुन : आज तुमच्या जोडीदारासोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क : प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या मित्राला भेटाल ज्याला भेटण्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल.
सिंह : व्यवसायात रखडलेले पैसे अचानक मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मनोबल आणखी वाढेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना पाठिंबा देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या जुन्या मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमचा हेवा करतील.
तूळ : आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त व्हाल, ज्यामुळे तुम्ही निराश व्हाल. आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.
वृश्चिक : आज तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. पराक्रमात वाढ होईल. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका. आज एखाद्या मित्राच्या मदतीने बरेच दिवस अडकलेले तुमचे पैसे मिळतील.
धनू : घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. चांगला आर्थिक लाभ संभवतो. आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अचानक सहलीला जाण्याची शक्यता आहे. आज एखाद्या मालमत्तेबाबत काही वाद असेल तर त्याबाबत शांत राहणेच हिताचे ठरेल.
मकर : आज संध्याकाळी थकवा, डोकेदुखी इत्यादी काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. भविष्याची चिंता करत बसू नका.
कुंभ : काही खर्च अचानक सामोरे येतील. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. घर किंवा ऑफिसमध्ये तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. समजा काही विपरीत परिस्थिती उद्भवल्यासशांत राहणे चांगले आहे.
मीन : कौशल्याने वागाल. व्यापार्यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. आज एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला काही पैसेही मिळतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचे सहकार्य आणि आशीर्वाद मिळतील. (Horoscope Today 28 November 2023)