मेष : शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. आज तुम्हाला काही निराशाजनक बातम्या मिळू शकतात.
वृषभ : मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. जर तुम्ही व्यवसायात एखाद्या व्यक्तीसोबत पैशाचे व्यवहार केले तर ती व्यक्ती तुमच्यासाठी यशस्वी होईल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते.
मिथुन : सामाजिक मान – मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनां कडून भेटवस्तू मिळतील. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे सावध राहा. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळाल्याने आनंद होईल.
कर्क : जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस ! आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून काही चांगले किंवा वाईट ऐकावे लागेल.
सिंह : विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या येत असतील तर आजच तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे जाऊन त्यावर उपाय शोधू शकता. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.
कन्या : आज तुमच्या मुलाचे लग्न निश्चित होऊ शकते. आज तुमचा तुमच्या सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतो. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील.
तूळ : आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. परदेशात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक : नोकरीच्या दिशेने काम करणारे लोक आज थोडे निराश होऊ शकतात. मित्राची योग्य साथ मिळेल. गरजूंना मदत कराल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र – मैत्रिणी भेटतील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
धनू : रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. भावंडांशी नाते दृढ होईल. विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभही मिळू शकतो.
मकर : जर तुम्ही आज नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्याच्यासाठीही चांगला असेल. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. अति कर्मठपणे वागू नका.
कुंभ : मित्र व नातेवाईक भेटतील. छोटया प्रावसाचे बेत आखाल. आपली प्रतिमा जपावी. घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा.आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून काही अशुभ बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला अनपेक्षित प्रवास करावा लागेल.
मीन : नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. घरगुती जीवन आनंदमय होईल. आज तुम्ही फिरायला गेलात तर तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती आहे.