मेष : मनात नकारात्मक विचार येतील. आर्थिक दृष्टया सुद्धा दिवस मध्यम फलदायी आहे. आज कामाच्या ठिकाणीही, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपेने तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.
वृषभ : धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबियांसह वेळ आनंदात जाईल.आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या किंवा मुलाच्या कोणत्याही समस्येसाठी प्रवास करू शकता. विकतची दुखणी घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. आज तुमच्या एखाद्या मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. सावधगिरी बाळगून कामे करावीत.
कर्क : पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. जर तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्रीची चिंता वाटत असेल तर आज तुम्हाला त्यावर उपाय मिळेल. खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. आरोग्याची काळजी घ्यावी.
सिंह : जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल तर त्याची कागदपत्रे तपासा. नोकरीच्या क्षेत्रात येणारे अडथळे आज दूर होतील. उद्योगाची स्थिती सुधारेल. हितशत्रू माघार घेतील.
कन्या : नोकरी – व्यवसायात सहकारी व अधिकारी नाराज होतील. आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल, ज्यामध्ये तुम्ही काही पैसेही खर्च कराल. तुम्ही तुमचे सर्व काम इतरांवर सोडू नये. आक्रमकतेने बोलू नका. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात.
तूळ : प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता. आज संध्याकाळी तुम्ही काही शुभ समारंभात सहभागी होऊ शकता. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल.
वृश्चिक : आज कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला बाहेरचे खाणेपिणे टाळावे लागेल. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.
धनू : नोकरी – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आज तुम्हाला उपासनेत रस असेल, परंतु आज तुम्हाला तुमच्या वाढत्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
मकर : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आज तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुम्ही फिरायला जाण्याचा विचार कराल. परंतू तुमच्या वाहनाच्या दोषामुळे तुमचा आर्थिक खर्च वाढू शकतो.
कुंभ : जमीन, घर, वाहन इत्यादी कागदपत्रां विषयी सावध राहावे लागेल.आज तुम्हाला तुमच्या कार्यालयात तुमच्या शत्रूंपासून सावध राहावे लागेल कारण ते तुमच्या वरिष्ठांना तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करतील. मनातील संभ्रम दूर करावा. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.
मीन : जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या. एखाद्या गूढ विषयाकडे आपण आकर्षित व्हाल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.