मेष : आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जीवनात आनंद लाभेल. कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. नोकरीत तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती अनुकूल करण्यात यशस्वी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काहींना गुप्त वार्ता समजतील. मनोबल उत्तम राहील. प्रत्येक बारीकसारीक गोष्टी वर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
वृषभ : आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. ऑनलाईन मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या व्यावसायिकांसाठीही हा काळ फलदायी ठरेल. काहींना नवा मार्ग दिसेल. गुरूकृपा लाभेल. उचित असे मार्गदर्शन लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळाल्याने. आज तुम्हाला यशप्राप्ती होईल.
मिथुन : वैयक्तिक जीवनात आनंदाची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी ही चांगली वेळ आहे. दैनंदिन कामात अडचणी आल्याने मन नाराज राहील. निरुत्साही राहाल. खर्च वाढणार आहेत. आज तुम्हाला तुमचे मनोरंजन होण्यासाठी थोडे पैसे खर्च करावे लागतील. आज कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी नीट विचार करावा.
कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होतील. सामंजस्य राहील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहणार आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला संयमाने आणि काळजीपूर्वक काम करावे लागेल.
सिंह : अनुभवी लोकांचा दीर्घकालीन अनुभव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सर्वत्र अनुकूलता लाभणार आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. आरोग्याचा ताण कमी होईल. भूतकाळात केलेल्या कोणत्याही चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. आज तुम्हाला तुमच्या कामात योग्य निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कन्या : प्रत्येक असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ नसेल. संततिसौख्य लाभणार आहे. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकाल. तुमचा प्रभाव राहील. प्रवासादरम्यान तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. विचारांचा निश्चित असा ठाम पणा आज राहणार आहे. स्वतःवर श्रद्धा ठेवा प्रश्न सुटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या अपूर्ण इच्छा आज पूर्ण होतील आणि तुमचे मन खूप आनंदी असेल. याचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल.
तुळ : स्वतःबरोबर सहवासात येणाऱ्या व्यक्तींनाही आनंद द्याल. दैनंदिन कामे त्रासदायक वाटतील. काहींना नैराश्य जाणवेल. प्रवास टाळावेत. स्वतःसाठी काही खरेदी कराल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. खूप पूर्वी राहून गेलेली कामे मार्गी लागण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आज तुमच्या करिअरसाठी सुवर्ण संधी मिळू शकतात. तुम्ही या संधींचा योग्य वेळी वापर करणे आवश्यक आहे.
वृश्चिक : आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नातेवाईक भेटतील. प्रवास सुखकर होतील. आरोग्याचा त्रास कमी होईल. मनोबल उत्तम असणार आहे. कलाकारांना महत्त्वाच्या संधी मिळतील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. पैशाच्या अडचणी संपुष्टात येतील. आर्थिक घडी बसेल. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल.
धनु : आज घाईघाईने कृती करण्याचा विचार हातून होण्याची शक्यता. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता घ्यावी लागणार आहे. अतिउत्साहीपणा नको. कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमच्या आनंदाला आणि उत्साहाला पूरक ग्रहमान आहे. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत. हितशत्रूवर मात कराल. आज तुम्हाला तुम्हाला कार्यालयीन राजकारणापासून दूर राहण्यासाठी तुमच्या कामाशी संबंधित गोष्टींवर विचारपूर्वक बोलावे लागेल.
मकर : सतत कुठली तरी चिंता मनात राहील. प्रियजनांबरोबर सुसंवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक कामे होतील. महिला काही नावीन्यपूर्ण काम करतील. अपेक्षित गाठीभेटी पडणार आहेत. उत्साही व आनंदी राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. विवाह इच्छुक तरुण-तरुणींचे विवाह जमतील. स्वतःवर विश्वास ठेवा प्रश्न सुटतील. आज तुम्ही तुमच्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा.
कुंभ : आज विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरेल. आजचा आपला संपूर्ण दिवस उत्साहात व आनंदात जाणार आहे. महिलांना संधी मिळतील. कामे मार्गी लागणार आहेत. दैनंदिन कामात सुयश प्राप्त होणार आहे. चिकाटी वाढणार आहे. स्वतःसाठी काही खरेदी कराल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. आज तुमच्या मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे.
मीन : भाऊबंदकी डोके वर काढण्याची शक्यता. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. आज तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायात सावधगिरी बाळगा आणि तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या.