मेष : आजचा दिवस परोपकाराचे कार्य करण्यात जाईल. आज आपला उत्साह विशेष असणार आहे. आपल्यावर असणारा ताण कमी होईल. तुमचे विरोधक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तुम्ही आज विशेष उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहाल. पैश्यांच्या देवाणघेवाणीचा जुना व्यवहार वेळेत पूर्ण करावा.
वृषभ : आजचा दिवस सुखद परिणाम घेऊन येणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साही राहाल. तुम्हाला नवी दिशा सापडेल. आज तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. नवीन विचार मनामध्ये येईल. आनंदी व आशावादीपणाने तुम्ही कार्यरत राहणार आहात. प्रवासाचे अनपेक्षित योग येतील. आज वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा.
मिथुन : आजचा दिवस प्रगतीचा दिवस असेल. काहींना आज मानसिक चिंता लागून राहणार आहे. अस्वस्थ राहाल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर अधिक कामाची जबाबदारी सोपवू शकतात. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. तुम्हाला नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.
कर्क : तुमच्या आर्थिक परिस्थिती आज उत्तम झाल्यामुळे आज तुम्ही आनंदी असाल. आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मनोबल उत्तम राहील काहींना आपल्या वैयक्तिक कामांना प्राधान्य देता येईल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आज कोणत्याही भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका.
सिंह : आजचा दिवस संमिश्र फलदायक ठरणार आहे. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. खर्च वाढणार आहेत. मानसिक उद्विग्नता राहील. आज तुम्ही स्पर्धेच्या क्षेत्रातही पुढे जाल. आज शक्यतो महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. वाहने सावकाश चालवावीत. तुमचे सर्व विचार एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीला सांगू नका, अन्यथा ते तुमची नंतर चेष्टा करू शकतात.
कन्या : आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे टाळावे लागेल. आज आपले वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचण आली तरी तुम्हाला चिडचिड करणे टाळावे लागेल. तुम्हाला आज विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे.
तुळ : बदलत्या हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. तुम्ही आपल्या घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. मनोबल उत्तम राहील. तुमची कोणतीही जुनी चूक आज तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकते. आशावादीपणे कार्यरत राहणार आहात. काहींना अनपेक्षित लाभ होणार आहेत. जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल.
वृश्चिक : आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही आपल्या विचारावर व मतांवर ठाम असणार आहात. तुम्ही तुमचे काही जुने कर्ज मोठ्या प्रमाणात फेडू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवी दिशा सापडणार आहे. प्रवासात आनंद मिळेल. आज नात्यात दुरावा येऊ शकतो.
धनु : काही प्रकरणांमध्ये, तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. आर्थिक कामात सुयश लाभेल. काहींना मिष्टान्न भोजनाचा लाभ होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही भरपूर पैसे खर्च कराल. स्वास्थ्य उत्तम राहील. तुम्ही आपल्या मनोबलाच्या जोरावर अनेक कामांत सुयश मिळवणार आहात. नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. त्यांच्यापासून तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे.
मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही सहज पार पाडू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आज तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. काहींना मानसिक प्रसन्नता लाभेल. खाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करा. तुमच्यामध्ये नवा उत्साह निर्माण होईल.
कुंभ : आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. मानसिक नकारात्मक राहील. आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. तुमचे खर्च वाढतील, त्यामुळे तुमच्या खर्चाचे अंदाजपत्रक बिघडू शकते. तुमचा वेळ अनावश्यक कामात वाया जात असल्याने तुमची चिडचिड होणार आहे. स्वास्थ्याचा अभाव राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही धावपळ कराल आणि थोडे चिंताग्रस्त राहाल.
मीन : नवीन योजनांचा चांगला फायदा होईल. संध्याकाळी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. काहींना विविध लाभ होणार आहेत. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. एखाद्या समस्येविषयी तुमच्या पालकांसोबत चर्चा करण्याची संधी मिळेल.
















