मेष : आज नवीन मालमत्ता खरेदीचे संकेत देत आहे. आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिकता सकारात्मक राहील. तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात बराच काळ तणाव होता, तो आज संपेल. प्रवासाचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
वृषभ : आजच्या दिवशी खूप खर्च करावा लागणार आहे. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे आज तुम्ही मार्गी लावू शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते.तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल.
मिथुन : उत्पन्न आणि खर्चाबाबत अंदाजपत्रक बनवावे लागेल. तरच तुम्ही तुमच्या खर्चाला मर्यादा घालू शकाल. मानसिक ताण-तणाव कमी होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना अचानकपणे प्रवास करावा लागेल. काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला अनुकूलता प्राप्त होणार आहे. प्रवासाचे योग येतील.
कर्क : नवीन नोकरी मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी असणारा आहे. तुम्ही आज कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. जर तुम्ही एखाद्या मित्राच्या सल्ल्याने पैसे गुंतवले तर त्यामुळे तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतील. काहींना अकारण एखादा मनःस्ताप संभवतो. प्रवासात काळजी हवी.
सिंह : व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आरोग्य सुधारेल. तुमच्या मानसिकतेमध्ये फरक पडणार आहे. सकारात्मक व्हाल. आज आपल्याला दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.तुमचे मनोबल उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात.
कन्या : कोणाशीही पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार करू नये. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. दैनंदिन कामांना अकारण वेळ लागेल. मानसिक ताण-तणाव राहतील. तुम्हाला तुमच्या काही गुप्त विरोधकांपासून सावध राहावे लागेल. वादविवादात सहभागी होण्याचे टाळावे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. संततीसौख्य लाभणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मच्या व्यवसायात भागीदार बनवले तर तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींच्या सहवासात आजचा दिवस आपण आनंदाने व्यतीत करणार आहात.
वृश्चिक : आज पूर्ण आत्मविश्वासाने तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. तुम्ही आज विशेष आनंदी राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळाल्याने खूप आनंद होईल. आशावादीपणे आज तुम्ही कार्यरत राहणार आहात. काहींना मान-सन्मान लाभणार आहे.
धनु : आज एखाद्या प्रवासाला जावे लागले तर ते पुढे ढकला, नाहीतर अपघाताचा धोका संभवतो. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची विशेष प्रगती होणार आहे. आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
मकर : आजचा दिवस खूप फलदायक ठरणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. आर्थिक व्यवहारात आज तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसायात तुम्ही तुमच्या काही योजना सुरू करू शकता. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होणार आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या मित्रासोबत सुरू असलेला वाद संवादातून संपवावा लागेल.
कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदात जाणार आहे. आज आपल्याला काही सकारात्मक अनुभव येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्हाला तुमच्या काही समस्यांविषयी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे.
मीन : व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर राहणार नाही. काहींना विनाकारण एखाद्या मनःस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखू शकता. नसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. अनावश्यक खर्च करावे लागतील.