मेष : अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. जर तुम्ही एखाद्या बँकेतून किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते सहज मिळेल. व्यापार – व्यवसायात लाभ होतील.
वृषभ : आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल. आज तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी अचानक बाहेरगावी जावे लागू शकते. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे.
मिथुन : कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. आज सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाही लाभ मिळू शकतो. आज तुम्हाला फालतू खर्चाच्या सवयी बंद कराव्या लागतील. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे.
कर्क : कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. आज तुम्ही तुमच्या ऐशोआरामावर काही पैसे खर्च कराल, तुमची प्रगती पाहून शत्रू तुमचा हेवा करतील. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.
सिंह : सासरच्या मंडळींकडून कोणावर नाराजी असेल तर तुमच्या मधुर वाणीने त्या व्यक्तीचा राग दूर कराल. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील.
कन्या : नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदाराची तब्येत थोडी बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला ताण येवू शकतो. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ : तुम्ही इतरांसाठी आधी विचार कराल आणि खऱ्या मनाने सेवा कराल, यामुळे तुमच्या मनाला आज शांतता मिळेल. इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल.
वृश्चिक : आपल्या हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आज तुम्हाला घर किंवा व्यवसायात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर खूप विचार करुन घ्यावा लागेल, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. जुगारातून लाभ संभवतो.
धनू : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्यात परोपकाराची भावना विकसित होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्याकडील पैशाचा काही भाग गरिबांवर खर्च कराल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.
मकर : आज तुम्हाला व्यवसायात खूप आनंद मिळेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्ही उत्साही असाल. भावासोबत असणारा वाद आज संपेल. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. अचानक जुने मित्र भेटतील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. आज तुम्ही सांसारिक सुखांचा आणि सेवकांचा आनंद घ्याल. आज संध्याकाळी सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.
मीन : आज सामाजिक सन्मान मिळाल्याने तुमचे मनोधैर्यही वाढेल. आज संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदात घालवाल. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल.
















