मेष : आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आज तुम्हाला सासरच्या बाजूने कोणाशी व्यवहार करायचा असेल जरा थांबा, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. अति विचारात गुंतू नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.
वृषभ : एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुमच्या व्यवसायात एखाद्याला पैसे उधार देत असाल तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल. आज मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल.
मिथुन : आज कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत भांडणाची परिस्थिती निर्माण झाली, तर तुम्ही गप्प राहणेच योग्य आहे. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आज उधारीचे व्यवहार करताना सावध राहा. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे.
कर्क : दुसऱ्याच्या चुका आपल्याल पटकन दिसतात पण स्वतःची चूक पटकन समजत नाही म्हणून समोरची व्यक्ती चुकते आहे असं पटकन म्हणू नये. आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल.
सिंह : आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आज कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू मिळवू शकता. व्यवसायात आज नफ्याची संधी मिळणार आहे. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. आज उधार देणे टाळावे. फसव्या लोकांपासून आज सावध राहा.
कन्या : नको असणारे खर्च संध्याकाळपासून रात्रीपर्यंत होवू शकतात ज्यामुळे चिंतेत वाढ होईल. परंतू तरी देखील आज तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आजचा दिवस लाभदायी आहे.
तूळ : आज कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. इतरांकडून तुम्हाला मदत मिळेल. नोकरीत तुम्ही आज असे काही निर्णय घ्याल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. नोकरीत बढतीची संधी लाभेल.
वृश्चिक : तुम्हाला काही अनावश्यक खर्चांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुमच्यावरील ताण वाढेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आज व्यवसायात अडचणी येण्याच्या शक्यता.
धनू : आज आपण काही सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्याल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात. आज तूमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, तरीही आज आपणास खूप सावध राहावे लागेल.
मकर : आज तुम्ही कामामध्ये विजयी होणार आहात, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका. मुलांच्या प्रगतीमुळे तुमच्या कुटुंबाचे नाव उंचावेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल.
कुंभ : व्यवसायातही आज ज्येष्ठांच्या मदतीने बऱ्याच काळापासून रखडलेल्या कोणत्याही कामात यश मिळेल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. आज कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल.
मीन : तुमच्या मनात तुमच्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना ही वाढेल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल. तुमची सद्सद्विवेकाचा वापर करून आज व्यवसायाशी संबंधित योग्य निर्णय घ्या. आज कोणत्याही कामात घाई करू नका. आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल.