मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात. खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. तुमच्या गोड बोलण्याने जोडीदाराची, कुटुंबातील सदस्यांची मने जिंकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
वृषभ : घरात खबरदारी घेऊन काम करावे. उत्साह व उमेद वाढेल. उगाचच भांडणात पडू नका. मनोबल उत्तम राहील. कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करीत असाल तर थांबा, कारण ते फेडणे कठीण होईल. विवाह इच्छुकांना चांगले प्रस्ताव येतील.
मिथुन : आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. धैर्याने परिस्थिती हाताळावी. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शेअर मार्केटमधील गुंतवणूक भविष्यात दुप्पट फायदा देणारी आहे. पण सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.
कर्क : वडीलधार्या मंडळींची काळजी घ्यावी. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. समोरच्या व्यक्तीमधील चुका काढत बसू नका. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आज चिंतेपासून मुक्ती मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकेल.
सिंह : आवडत्या वस्तू खरेदी कराल. एखादी गुप्त वार्ता समजेल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. मनोबल कमी राहील. व्यावसायिक भागीदारांपैकी एकाच्या मदतीने समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कन्या : कामानिमित्त प्रवास घडेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. अचानक खर्च उद्भवू शकतात. प्रवास सुखकर होतील. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, अन्यथा भविष्यात तो मोठ्या आजाराचे मोठे रूप घेऊ शकतो.
तूळ : अनावश्यक खर्च कमी करा. हितशत्रुचा त्रास संभवतो. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. वाहने जपून चालवावीत. जोडीदाराला धार्मिक स्थळी घेवून जाणार आहात.नातावाईकांना उधार देवू नका तुम्हाला पैसे परत मिळताना अडचण होईल.
वृश्चिक : आपले विचार लोकांसमोर मांडाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनावश्यक खर्च उद्भवतील. आर्थिक क्षेत्रात लाभ होतील. व्यवसायात गती येईल. कार्यक्षेत्रात व्यस्त राहिल्यास ते चांगले राहील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
धनु : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कुटुंबातील सदस्याकडून वेळेवर मदत न मिळाल्याने थोडे चिंतेत असाल. पण ही गोष्ट तुम्ही कोणासोबत शेअर करणार नाही.
मकर : आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी जे काही प्रयत्न कराल, त्यात नक्कीच यश मिळेल. मित्रांसोबत संध्याकाळ छान व्यतीत होणार आहे.
कुंभ : छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यावसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. तरच व्यवसायात वाढ होईल. जर तुम्ही एखादा निर्णय घेतला तर तुम्हाला तो अडचणीत आणू शकतो.जोडीदाराशी वाद होत असेल तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
मीन : मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. पदोन्नतीचे योग संभवतात. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. नोकरदारांना पैशाची चणचण भासेल त्यामुळे तुमचे ताणतणाव वाढतील. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्याची मदत घेऊ शकता.