मेष : तुमची गाडी बिघडल्यामुळे तुमच्या खर्चात अचानक वाढ होवू शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आज कुटुंबातील छोटे सदस्य तुमच्याकडे काही मागणी करतील ती पूर्ण करा. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. स्वत:साठी वेळ काढावा.
वृषभ : कामाच्या ठिकाणी किंवा घरात एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला राग येत असेल तरी तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आज सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होणार आहे. वाहने जपून चालवावीत. आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.
मिथुन : कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी पाहून तुमचे सहकारीही आश्चर्यचकित होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत राहणार आहात. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल.
कर्क : तुमचे पैसे जास्त खर्च झाल्यामुळे तुमच्यावर ताण येणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. जर आज तुमच्याकडे कोणी कर्ज मागितले तर नीट विचार करुन समोरच्या व्यक्तीला कर्ज द्या. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
सिंह : आज व्यवसायात उत्पन्नाच्या नवीन मार्गांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरदार लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काही बदल पहायला मिळतील. हितशत्रुंवर मात कराल. व्यापार्यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल.
कन्या : आज तुमचे काही शत्रू प्रबळ होतील, पण तुम्ही तुमच्या क्षमतेने आणि बुद्धीमत्तेने त्यांचा पराभव कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक नुकसान होऊ शकते. वादविवाद टाळावेत. जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल.
तुळ : आज विद्यार्थ्यांना शिक्षकांचे पूर्ण पाठिंबा मिळेल त्यामुळे अभ्यासातील अडचणी कमी होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. .आज पैशांचा काही भाग धार्मिक कार्यक्रमांमध्ये गुंतवाल. उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील.
वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे, कारण तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. शत्रू तुमची प्रगती आणि भरभराट पाहून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी.
धनु : तुमची दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यात आज तुम्हाला यश मिळणार आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आज कुटुंबातील विवाहयोग्य सदस्यासाठी स्थळ येवू शकते. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल.
मकर : तुम्ही मानसिक समस्यांमुळे त्रस्त असाल त्यामुळे कामाच्या ठिकाणी काही चुका होतील,राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. आज कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वायफळ खर्च केला जाऊ शकतो.
कुंभ : तुम्ही परिक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा निकाल आज येवू शकतो आणि त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आज तुम्हाला माहेरकडून काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते. मनोबल उत्तम राहील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल.
मीन : आज कौटुंबिक बाबतीत खूप समाधान मिळणार आहे. जुन्या आठवणींना तुम्ही आज उजाळा देणार आहात. शासकीय कामे मार्गी लागतील. आज कुटुंबात जर काही कलह सुरू असेल तर तोही संपेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. रखडलेले काम पूर्ण होईल.