मेष : व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. व्यवसायात वाढ होईल. आज सायंकाळी तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी व्हाल, यामध्ये तुम्हाला नातेवाईकाकडून एखादी महत्त्वाची माहिती मिळेल.
वृषभ : दिवस हसत-खेळत जाईल. जुनी येणी वसूल होतील. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. निर्णय योग्य ठरतील. व्यापारात तुमचे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकतील. आजच्या दिवशी तुमच्या मनातील इच्छा इतरांना सांगितली नाही, तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन : योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. उत्साह वाढेल.अनेक दिवसांपासून रखडलेले सरकारी काम पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न करा, यात तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याची मदत होऊ शकते.
कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आज दूरच्या एखाद्या नातेवाईकाशी काही वाद असतील तर किंवा मतभेद असतील तर तुमच्या बोलण्याने तुम्ही वाद संपवाल, जेणे करून कुटुंबातील एक्य वाढेल.
सिंह : कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आज कोणताही निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या आणि घाईगडबडीत, अतिउत्साहात निर्णय घेणे टाळा, अन्यथा तुम्हाला भविष्यात पश्चाताप करण्याच वेळ येऊ शकते.
कन्या : लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. प्रवास सुखकर होतील. व्यापारात जर आज पैशांची देवाणघेणाण करावी लागणार असेल तर सावध राहा, कारण तुमचे पैसे बुडू शकतात आणि जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते.
तुळ : संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. कोणालाही जामीन राहू नका. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील. उत्साह व उमेद वाढेल. आज कुटुंबात मुलांकडून तुम्हाला शुभ अशी बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्या कामात गुंग असतील.
वृश्चिक : वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. वाहने जपून चालवावीत. आज घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट वाईट वाटली तरी ती मनात ठेवा, तरच तुम्हाला यश मिळेल. जर आज एखादी मालमत्ता खरेदी करणार.
धनु : प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आज त्यांना मनासारखी नोकरी किंवा व्यवसाय करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला मित्राकडून भेटवस्तू मिळतील.
मकर : कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. व्यापार्यांना अपेक्षित लाभ मिळेल. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आज सायंकाळी तुम्ही कुटुंबीयांसमवेत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आज खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा, अन्यथा पोटाशी संबंधित विकार डोकेवर काढतील.
कुंभ : तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज कुटुंबीयांसोबत पिकनिकवर जाण्याचे नियोजन कराल, पण यासाठी तुम्हाला आईवडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. आज सायंकाळी नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी येईल.
मीन : प्रॉपर्टीचे सौ’य लाभेल. रदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल. प्रवास सुखकर होतील. व्यवसायावर लक्ष ठेवावे लागेल. तुमचे काही शत्रू असे आहेत ते तोंडावर गोड बोलतील आणि पाठीत खंजिर खुपसतील, त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल. व्यापारात तुमचे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकतील.