मेष : तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही मुद्द्यावर भांडण झालं असेल तर त्यावर आज तोडगा निघेल. अति उत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायचा विचार करत असाल तर दिवस अतिशय उत्तम आहे, हे काम तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरेल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत अधिकाऱ्यांची मदत घ्या अन्यथा विरोधक तुमचा फायदा हिसकावून घेवू शकतात. आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका.
कर्क : कोणाच्या सांगण्यावरुन किंवा दबावाखाली जर तुम्ही हे काम करत असाल तर भविष्यात नुकसान होवू शकते. लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. जोखीम पत्करावी लागेल.
सिंह : दुसऱ्यांच्या कामात लक्ष देवू नका अन्यथा तुमचा वेळ वाया जाईल तसेच तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील.
कन्या : तुम्ही व्यावसायिक असाल तर सांभाळून राहा आज प्रतिस्पर्धी हल्लाबोल करु शकतात. तुम्हा आज खूप डोकेदुखीचा त्रास होणार असून तुमचा ताण जास्त वाढणार आहे. जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका.
तूळ : तुम्ही आज खूप आनंदी असाल पण आनंदाच्या भरात कोणाला जास्त आश्वासने देऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्तापाचा सामना करावा लागले. दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. संयमित व्यवहार करू नका.
वृश्चिक : आज तुम्हाला ऑफिसमध्ये अशी काही कामे देण्यात येतील ज्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी दिवस छान असणार आहे. शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे.
धनू : ऑफिस वर्क आणि घर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या रागीट स्वभावामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला समस्या होत असेल तर तुम्ही मौन बाळगणे चांगले आहे. विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मकर : आज संध्याकाळी तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामध्ये तुमचे काही पैसेही खर्च होतील. कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. जुगारातून लाभ संभवतो.
कुंभ : एखाद्या महिलेमुळे तुमच्या घरात काही कलह निर्माण होऊ शकतो, ज्याचा तुम्हाला खूप त्रास होईल. काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका.
मीन : तुम्हाला एखाजी समस्या सतावत असेल तर पुढे येवून त्याबदद्ल बोला अन्यथा ती समस्या वाढू शकते. ज्येष्ठ व्यक्ती किंवा वरिष्ठांचा सल्ला घ्या ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा.