मेष : तुम्ही जर नोकरी करीत असाल तर प्रमोशनमध्ये अडथळे येतील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही हिमतीने आपली मते इतरांना ठामपणे पटवून देणार आहात. आज तुमचा दिवस नवा उत्साह घेऊन आला आहे. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : आज चांगली कमाई झाल्याने ऐशोआराम आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. कामाचा ताण जाणवणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना अडचणी जाणवणार आहेत. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. काहींचा वेळ व्यर्थ वाया जाणार आहे. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल.
मिथुन : आज व्यवसायात खूप मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आनंदी राहणार आहात. आज तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. जोडीदाराचे वर्चस्व राहील. काही जण जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. कौटुंबिक संबंध दृढ होतील.
कर्क : प्रेम जीवनात जपण्याचा संपूर्ण प्रयत्न प्रामाणिकपणे करा. सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत.भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात. आज तुमची गुंतागुंत कमी होईल.
सिंह : आज मौज मस्ती, पार्टी आणि कोणा प्रिय व्यक्तीसोबत हिंडण्या फिरण्यासाठी सुट्टीच्या मूडमध्ये असाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी प्रगती साध्य करू शकणार आहात. लबाड लोकांपासून दूर राहावे. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. प्रवासात सौख्य लाभणार आहे.
कन्या : आज लोक तुमच्या कलात्मक गुणांची प्रशंसा करतील. कौटुंबिक जीवनात आनंददायी अनुभव येणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. संभाषण कौशल्य दाखवता येईल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आर्थिक कामात सुयश लाभल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे. आज मुलांच्या बाजूने सुखद अनुभव येतील.
तुळ : आज उत्पन्नाचे नवे मार्ग सापडण्याची शक्यता आहे. आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आनंददायी घटना घडेल. प्रवासाचे योग येणार आहेत. सतत काहिनाकाही विचार करत राहाल. मनोबल उत्तम राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आज कोणतेही काम विचारपूर्वक करावे.
वृश्चिक : आर्थिक लाभासोबत तुम्हाला आज सन्मान सुद्धा मिळू शकेल. मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे. आज तुम्हाला एखादी चिंता सतावणार आहे.कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. अनावश्यक खर्च टाळावेत. कामे नकोशी वाटतील. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल.
धनु : आज नव्या व्यवसायात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज तुमचे सहकारी तुमच्यावर खूश असणार आहेत. तुमचा इतरांवर असणारा प्रभाव वाढेल. अति चिकित्सा करू नका. महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूलता लाभणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आज तुम्हाला प्रमोशनशी संबंधित बातम्या मिळू शकतात.
मकर : तुमच्यासाठी प्रवास फार उपयोगी आणि लाभदायक राहील. तुमचा विशेष प्रभाव राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आर्थिक क्षेत्रात विकासाची शक्यता आहे.
कुंभ : तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने हा खूप चांगला दिवस असेल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. मनोबल वाढणार आहे. आज काहींना गुरुकृपा लाभेल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. आज अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवासात सुखद अनुभव येईल. जिद्द वाढेल.
मीन : तुमचे प्रेम व्यक्त करण्याची आणि तुमचे आवडते विचार व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. अस्वस्थता जाणवणार आहे. व्यवहार चातुर्य दाखवाल. आज आपण कोणत्याही बाबतीत अतिताण घेऊ नये. आज तुमच्या वैवाहिक जीवनात खूप आनंद असेल. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याचे टाळावे.