मेष : कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांच्या बाबतीत तुम्ही एखाद्या मित्राशी चर्चा करू शकता. अनेक बाबतीत आज आपली मानसिकता अत्यन्त सकारात्मक असणार आहे. आपण आनंदी राहणार आहात. भावंडांकडून मदत मिळेल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. पैसे गुंतवणूक करण्यापूर्वी आधी अनेक वेळा विचार करा.
वृषभ : आजचा दिवस आनंदाच्या बातम्या घेऊन येणार आहे. आपले विचार ठामपणे मांडणार आहात. जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईक भेटल्याने आनंदी होणार आहात. कामाच्या ठिकाणी विनाकारण वादामध्ये पडू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. प्रवास होणार आहेत. ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चा करणे टाळा आणि कोणाबद्दलही वाईट बोलू नका.
मिथुन : एखाद्या कामात येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना अपेक्षित फोन व मेसेजेस मिळतील. आज दिवस देण्याघेण्याच्या बाबतीत सावध राहावे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. मनोबल उत्तम राहणार आहे. आजचा दिवस चांगला जाईल.
कर्क : तुमच्या आईचा एखादा जुना आजार पुन्हा डोकं वर काढेल, काळजी घ्या. आजच्या दिवसाची आपण उत्साहाने सुरुवात करणार आहात. आपले आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यवसायात कोणालाही पार्टनर करू नका. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. गेले दोन दिवस असणारे नैराश्य व अस्वस्थता संपणार आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.
सिंह : आज गाडी चालवताना अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. आज आपणाला काही बाबतीत प्रतिकुलता जाणवणार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. कोणाकडून पैसे उधार घेण्यापासून स्वत:ला रोखले पाहिजे. दैनदिन कामात आपणाला अडचणी व अडथळे जाणवणार आहेत. प्रवासात काळजी हवी. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला फायदा मिळेल.
कन्या : व्यवसायात तुम्हाला अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र मैत्रिणी भेटल्याने तुमचे मन प्रफुल्लित होणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आज नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक कामास आजचा दिवस अनुकूल आहे. आपले अंदाज अचूक ठरणार आहेत. व्यापार्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
तूळ : आज आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आजचा दिवस अत्यन्त उत्साही असणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. मुलांच्या संगतीवर तुम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या कामात व दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे.दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल.
वृश्चिक : तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आपली प्रलंबित कामे आपण मार्गी लावणार आहात. आपल्या वागणुकीमध्ये गोडवा ठेवा. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता संपणार आहे. धंदा व्यवसायात अति धाडस करु नका. व्यवसायाच अस्थिरता निर्माण होईल.
धनु : आज तुम्हाला धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज आपल्याला कसलीतरी चिंता सतावणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येण्याची शक्यता आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आज आपण कोणत्याही वादविवादात अडकू नये. आज कोणताही व्यवहार करताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा.
मकर : सासरच्या कोणा व्यक्तीला जर तुम्ही पैसे उधार दिले असतील तर आज तुम्ही ते परत मागू शकता. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आपला प्रभाव वाढणार आहे. आपण आपली महत्त्वाची कामे आज पूर्ण करू शकणार आहात. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
कुंभ : जबाबदारीचे ओझे तुमच्या डोक्यावर पडू शकते. आपला वेळ वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील. तुम्ही तुमच्या विचारांना एक नवीन वळण देऊ शकता. काहींना एखाद्या बाबतीत अनावश्यक मनस्ताप होणार आहे. मनोबल कमी राहील. आज कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू नका. फक्त आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मीन : तुमच्या कार्यालयातील अधिकार्यांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. आज आपण आपल्या मुलामुलींकरिता वेळ देणार आहात. अनपेक्षितपणे प्रियजनांच्या गाठीभेटी पडणार आहेत. आज तुमची प्रकृती सुधारू शकते. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुम्हाला नवीन व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही थोडा वेळ थांबावं. आज उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल ठेवावा लागेल.