मेष : आजचा दिवस अत्यंत फलदायक ठरणार आहे. शांत व संयमी रहावे. मनोबल कमी असणार आहे. तुम्ही वडिलधाऱ्यांच्या भांडणात पडू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. तुमच्या साहसी आणि धाडसी वृत्तीत वाढ होईल. खर्च वाढणार आहेत. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस संमीश्र फळ देणारा असणारा आहे.
वृषभ : आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. पैशांसंबंधी बाबी आज सहजतेने सोडवाल. प्रवास सुखकर होतील. विविध लाभ होणार आहेत. तुम्ही तुमच्या वडिलांना एखाद्या गुंतवणुकीविषयी सांगाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायिकांनी कामात कोणतीही अनियमितता करताना थोडे सावध राहायला हवे.
मिथुन : आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. विशेष प्रसन्नपणे कार्यरत राहणार आहात. तुमचे काम वेळेवर पूर्ण करा. प्रवास सुखकर होतील. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात चांगला फायदा झाल्याने खुश असतील. नोकरी, व्यवसायात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायात थोडे सावधगिरी बाळगा. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
कर्क : आज पैसा विचारपूर्वक खर्च केला पाहिजे. नातेवाईक भेटणार आहेत. उचित मार्गदर्शन लाभेल.तुम्ही तुमचे उत्पन्न आणि खर्च याचा नीट तपशील ठेवा. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च करू नका. जिद्दीने काम करणार आहात. आनंदी राहणार आहात. सरकारी कामात दिरंगाई करू नका. अन्यथा कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता.
सिंह : मित्रांच्या मदतीने एखाद्या व्यावसायिक योजनेत तुम्ही पैसे गुंतवाल. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आज निष्काळजीपणा करून चालणार नाही. आरोग्य उत्तम राहणार आहे.व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यापारी वर्गाचे रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : आज पदोन्नती मिळू शकते. विशेष उत्साही रहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाल. आज कोणतेही नवे काम सुरू करण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आर्थिक कामा संदर्भातील चर्चा सफल होईल. तुम्ही परदेशी कंपन्यांसोबत कोणताही व्यवहार केला तर तुम्हाला नफा मिळू शकतो.
तुळ : विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणासाठीचा मार्ग आज प्रशस्त होईल. मनोबल कमी राहील. आज आपणाला कसली न कसली चिंता लागून राहणार आहे. व्यवसायात मोठा फायदा व्हावा म्हणून छोटे छोटे फायदे देणाऱ्या संधी चुकवू नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात करू शकणार आहात. व्यवसायाचा विस्तार करण्याचाही विचार करू शकता.
वृश्चिक : आज कुटुंबियांसाठी सुद्धा तुम्ही थोडा वेळ काढणं आवश्यक आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. तुमच्याकडून काही चूक होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होतील. संततीसौख्य लाभेल. काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सल्ला मसलत कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना उद्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
धनु : दांपत्य जीवनात सुख – सम्मृद्धी वाढल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक कामे होतील. फूड बिझनेस करणाऱ्या लोकांना उद्या थोडे सावध राहावे लागेल.
मकर : व्यावसायिक बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी तुम्हाला लाभेल. कामाच्या ठिकाणी आज तुमची मेहनत बघून तुमचे वरिष्ठ तुमची खूप स्तुती करतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. आरोग्य सुधारेल. आजचा दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात खूप चांगला असेल.
कुंभ : शैक्षणिक विषयात तुम्हाला आवड निर्माण होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. सध्या आपण ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करत रहावे. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. संयमी रहावे. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. थोडक्यात आजचा दिवस चांगला राहील.
मीन : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत प्रवास सुखकर होतील. कोणत्याही कामासाठी हट्ट करू नका नाहीतर ते काम बिघडू शकतं. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. आज तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.
















