मेष : जोडीदाराच्या चुकांकडे दुलर्क्ष करा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. आत्मविश्वासाने काही प्रश्न सोडवणार आहात. आज तुमचे मनोबल चांगले राहील. भागीदारीत सुयश लाभेल. गरजूंना मदत करणार आहात.प्रकृती चांगली राहील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आर्थिक व्यवहार जपून करा.
वृषभ : प्रेमसंबंधात जवळिक वाढेल. मनोबल कमी राहील. तणाव आणि थकवा जाणवेल. कायदेशीर वाद सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला. आज तुम्ही कसलातरी अनावश्यक ताण घेणार आहात. आरोग्याच्या तक्रारी राहतील. हितशत्रूवर मात करणार आहात. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकदृष्टय़ा नफा चांगला मिळेल.
मिथुन : एखाद्या गरजू व्यक्तीच्या उपचारात मदत कराल.संततीकरिता वेळ देऊ शकाल. आनंदी व आशावादी राहाल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. कामाच्या निमित्त दीर्घ प्रवासाचा योग आहे. कामे यशस्वी होणार आहेत. कौटुंबिक जीवनासाठी आज चांगला दिवस. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील.
कर्क : आज ऑनलाईन व्यवहारात सावध राहा. मानसिक प्रसन्नता राहणार आहे. आपण आपल्या घरासाठी वेळ देणार आहात काहींना मातृसौख्य लाभेल. काहींचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. जोडीदारासोबत तुमचा दिवस चांगला जाईल. आरोग्य उत्तम राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
सिंह : गरजू लोकांना मदत करण्यात यशस्वी व्हाल. काहींना नवी दिशा सापडेल. अनुकूल बदल करणार आहात. तुमच्या व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. तुमच्या कार्यक्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार आहात. आजचा दिवस शांतते जाईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आर्थिक प्रश्न मिटेल.
कन्या : खोटे बोलणाऱ्यांपासून दूर राहावे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. कौटुंबिक जीवनातील सुखद अनुभव विशेष सौख्य देतील. व्यवसाता लागू केलेला नवा नियम फायद्याचा सिद्ध होईल. दैनंदिन कामे वेगाने पूर्ण होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आज कोणताही निर्णय घ्यायला घाई करू नका.
तुळ : आज तुमची खोटी स्तुती होऊ शकते. कामाचा ताण कमी कराल. आनंदी व आशावादी राहिल्याने प्रफुल्लित व ताजेतवाने राहाल. आज अनेक मार्गांतून पैसे येतील. काहींचा इतरांवर प्रभाव असणार आहे. जोडीदार तुमच्यासोबत खुश राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : वैवाहिक सौख्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील. आज पैशाशी संबंधित अडचणीतून मार्ग निघेल. आरोग्याच्या तक्रारी मानसिक अस्वस्थता देतील. व्यवसायात जोडीदाराच्या सल्ल्याची गरज भासेल. प्रवासात काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू जपावी. व्यवसायात अपेक्षेपेक्षासुद्धा चांगला लाभ होईल.
धनु : आज तुमचे विचार इतरांसमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करा. प्रवास सुखकर होणार आहेत. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करताना दोन वेळा विचार करा. सहकारी व मित्र-मैत्रिणी यांचे विशेष सहकार्य लाभेल. आनंदी राहाल. संततीसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होईल.
मकर : आज तुम्हाला जोडीदारासोबत चांगले वाटेल. नोकरी, व्यवसायातील प्रश्न मार्गी लावणार आहात. महत्त्वाच्या गाठीभेटी सफल होतील. आनंदी राहाल. मित्रांसोबत प्रवासाला जाणे रोमांचक ठरेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभणार आहे. आज व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करा. मान-सन्मानाचे योग येणार आहेत. व्यवसायात गुंतवणूक करावी लागेल.
कुंभ : आज लहान गुंतवणूक आवश्य नक्की करा. प्रवास सुखकर होतील. अनपेक्षित धनलाभ होईल. मानसिकता सकारात्मक होईल. व्यवसायच्या दृष्टीने ग्रहस्थिती अनुकूल राहील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठीआर्थिक फायद्याचा राहील. आर्थिकदृष्टय़ा प्रगती होईल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. नातेवाईक भेटतील. काहींना एखादी चिंता सतावणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. विवाहित लोकांसाठी आजचा आनंदाचा राहील. कामात अडचणी जाणवतील. नोकरीत तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. वाहने सावकाश चालवावीत. मनोबल कमी राहील. आर्थिक बाबतीत उधारीचे व्यवहार टाळा.