मेष : नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साह राहील. मानसिक प्रसन्नता राहील. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. आशावादीपणे कार्यरत रहाल. आज तुमच्यात अहंकार असू शकतो, तुम्हाला यापासून दूर राहावे लागेल.
वृषभ : आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. नातेवाईक भेटणार आहेत. भावंडांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. तुम्ही तुमच्या वाणीने लोकांना जिंकून घेण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते.
मिथुन : जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. कामाचा ताण राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आर्थिक अडचणीत तुमचा आनंद आणि वेग फसू शकतो. तुमच्या इच्छाशक्तीमुळे तुम्ही समाजात प्रशंसेसाठी पात्र ठराल.
कर्क : मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. चिकाटी वाढणार आहे. आज विरोधकांपासून सावध राहा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात रोमान्सची संधी मिळेल.
सिंह : सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल कमी असणार आहे. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आज प्रकृती नरम राहील. आज कामात फार मन लागणार नाही, पण नशिब साथ देत असल्याने बरीच कामे मार्गी लागतील.
कन्या : मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. आर्थिक लाभ होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. चिकाटीने कार्यरत रहाल.बँकेकडून कर्ज घेतल्याने तुम्हाला यश मिळेल. व्यापारासाठी आजचा दिवस चांगला आहे.
तुळ : एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा प्रभाव वाढेल. मानसन्मानाचे योग येतील. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. आनंदी व आशावादी रहाल. कुटुंबीयांची मनातील गोष्ट समजून घेऊन चांगले क्षण आणण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात तणाव राहील.
वृश्चिक : पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. नातेवाईक भेटणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. मनाबेल उत्तम राहील. जुनी कामे पूर्णत्वास जातील. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. प्रेमजीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे, पण तुमचा जोडीदार एखाद्या गोष्टीवर अडून बसेल, त्यामुळे भांडखोरपणा दिसेल.
धनु : व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आनंद राहणार आहात. बोलताना तारतम्य बाळगा. आर्थिक कामात सुयश लाभेल. आज कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनही आज चांगले राहील. प्रेमसंबंधात मात्र तणाव राहील.
मकर : घरात अनावश्यक खर्च निघेल.आर्थिक कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अस्वस्थता संपेल. विरोधक नामोहरम होतील. प्रवास होतील. आज तुम्ही प्रॉपर्टी खरेदीचा विचार कराल. तसेच आज वाहन खरेदीची परिस्थिती बनू शकते.
कुंभ : धार्मिक कार्यात रुची वाढेल. कामामध्ये लक्ष लागणार नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. प्रतिकूलता राहील. उत्पन्न कमी होईल, पण खर्च वाढतील. मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी. व्यवसायातील लोकांना चांगले परिणाम दिसतील.
मीन : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. नोकरीत आजचा दिवस सामान्य राहील.