मेष : आज आर्थिकस्थिती सामान्य राहील. आपण अधिक जिद्दीने कार्यरत रहाल. चिकाटीने एखादा प्रश्न सोडवणार आहात. अपूर्ण सरकारी कामे भविष्यात पूर्ण होतील. काहींना नवा मार्ग दिसेल. आरोग्य सुधारणार आहे. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील.
वृषभ : आज कामचा उत्साह राहील. आर्थिक लाभाच्या घटना मनाला आनंद देणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कौटुंबिक वातावरण थोडे अशांत राहील, पण नंतर शांतता राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. कमिशन मधून फायदा संभवतो. स्थावरच्या कामात लाभ होईल.
मिथुन : आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घ्यायचे टाळा. आपल्यामध्ये नवा उत्साह व उमेद निर्माण होईल. आरोग्य उत्तम राहील. पैसे कमी असल्याने किंवा काही विशेष गरजेसाठी कर्ज घ्यावे लागू शकते. नैराश्य व मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.
कर्क : आज कौटुंबिक जीवनात आनंद राहील. मानसिक अस्वस्थता आपल्याला अशांत ठेवणार आहे. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यात अपयशी ठराल, पण नातेवाईकांचे भावनिक सहकार्य मिळेल. मनोबल व आत्मविश्वास कायम ठेवावा. अकारण त्रास करुन घेऊ नये. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
सिंह : आज शत्रू तुमच्यावर जास्त वरचढ ठरू शकतात.जुने मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. काही जुन्या आजारांमुळे प्रकृतीबद्दल साशंकता राहील. आनंदी व आशावादी रहाणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. जुन्या कामातून लाभ संभवतो. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. कमिशन मधून फायदा संभवतो.
कन्या : आज नशिब तुमची मदत करेल, आणि तुम्हाला नव्या संधी मिळतील, ज्याचा तुम्ही लाभ उठवाल. दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर विशेष प्रभाव राहील. घरी कुटुंबीयांचे मन राखण्यासाठी तुम्ही वैयक्तिक खर्चात कपात करून मनात नसतानाही खर्च कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल.
तुला : आज तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. मानसिक अस्वस्थता संपेल. आनंदी वातावरण लाभेल. वाहन चालवताना सावध राहावे. शक्य असेल तर आज दूरचा प्रवास टाळा. आर्थिक बाबतीत बुद्धीने काम घ्यावे. संततीच्या बाबतीत चिंता राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम संधी लाभणार आहे. आज कानाचे त्रास संभवतात.
वृश्चिक : आर्थिक देवाणघेवाणीतून लाभ होईल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. मानसिक अस्वस्थता वाढेल. शेअर्समधील गुंतवणुकीतून फायदा होईल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. उधार देऊ अथवा घेऊ नका. प्रवासात काळजी हवी. दिवस खटपटीत जाईल. लहरीपणाने वागू नका.
धनु : आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. आज आर्थिक विषय सोडले तर इतर बाबतीत तुमचे मन संतुष्ट राहील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळले. मानसिक प्रसन्नता लाभेल. रागावर नियंत्रण ठेवा.
मकर : पैशाच्या बाबतीत तुम्ही दुपारपर्यंत अस्वस्थ राहाल. खर्च वाढणार आहेत. काहींचे आरोग्याकडे दुर्लक्ष होणार आहे. काहींचे कामात लक्ष लागणार नाही. आज तुम्ही स्वतःच्या चुका न पाहाता इतरांतील कमतरता दाखवू लागला तर घरात कलह निर्माण होईल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. प्रवास नकोत. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो.
कुंभ : राग आणि वाणी यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील कोणाशी तरी मतभेद होतील. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. संततीसौख्य लाभणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक देवाणघेवाणीपासून दूरच राहा. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल
मीन : तुम्हाला भावांचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. प्रॉपर्टी व गुंतवणूकीची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. विरोधकांपासून सावध राहा. कामे यशस्वी होणार आहेत. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. सामुदायिक वादात अडकू नका.