मेष : एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. गरजूंना मदत कराल. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत.थकवा अधिक राहील आणि स्वभावात चिडचिडेपणामुळे घरातील काम अव्यवस्थित राहील.
वृषभ : कोणतेही वचन देताना सावध रहा. आत्मविश्वास वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. प्रभाव वाढेल. सरकारी कामात निश्चित यश मिळेल पण वडिलोपार्जित बाबी काही कारणाने अनिश्चित राहतील.
मिथुन : निर्णय तुमच्या बाजूचा असेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक कामे आज नकोत. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. नोकरी-व्यवसायात निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, अधिक काळजी घ्या. सामाजिक संबंधात कटुता राहील.
कर्क : वरिष्ठांना खुश कराल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात सुरू असलेल्या व्यवसायाच्या योजनेतून आज दिशा मिळाल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
सिंह : अधिकाराची अंमलबाजावणी करावी. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. आनंददायी घटना घडेल. पायाची दुखणी संभवतात. उत्साह व उमेद वाढणार आहे. आज दुपारी काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. घरातील महिलांशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात
कन्या : मनातील इच्छा पूर्ण कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. कामातील मंदीमुळे आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल.जोखमीच्या कामात गुंतवणूक केल्याने प्रथम तोटा होईल.
तुळ : इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. अनेक बाबतीत समाधान लाभेल. कोणतीही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता सतर्क ठेवा. व्यवसायात किंवा गुंतवणुकीत कोणताही बदल अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानेच करा.
वृश्चिक : मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. आज डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रवासाचे योग येणार आहेत. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे उधार देऊ नका, बुडण्याची शक्यता आहे, परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी दिवस चांगला आहे.
धनु : संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. नियमांना तडा जाऊ देऊ नका. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. आज घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरतील. प्रलोभनांपासून दूर राहा. आवश्यकतेनुसार आर्थिक फायदा नक्कीच होईल.
मकर : लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. चारचौघात कौतुक होईल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. आज तुमची व्यावहारिकता कमी होऊ देऊ नका, यामुळे फायदेशीर संपर्क निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी निरुपयोगी बाबींवर वाद होतील.
कुंभ : बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. अधिकार्यांकडून काम करून घेण्यासाठी तुम्हाला चकमकीचा अवलंब करावा लागेल, परंतु तरीही कामात यश निश्चित नाही.
मीन : अतिघाईत निर्णय घेऊ नका. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. व्यावसायिक विकास शक्य होईल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. मन भरकटेल पण एकाग्र आणि कामात मग्न राहील. आज तुम्ही व्यवसायात ज्या योजनेवर काम करत आहात ते तुम्हाला नजीकच्या भविष्यात आर्थिक लाभ देईल.