मेष : आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने कामाच्या ठिकाणी चांगले स्थान निर्माण कराल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरी, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल.
वृषभ : तुम्ही मनात तुमच्या नातेवाईकांबद्दल कोणत्याही प्रकारचा आकस ठेवू नका. आज तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. तुमच्या घरात पाहुणे आल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्या नातेवाइकांच्या मदतीने एखादी समस्या सोडवणार आहात. नोकरी, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज खूप मेहनत घ्यावी लागेल.
मिथुन : आजचा तुम्हाला सकारात्मक फळे मिळणार आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. मनोबल उत्तम राहील. काही कामांवर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. नोकरीच्या ठिकाणी काही यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. एखादी गुप्तवार्ता समजेल. आशावादी राहणार आहात. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.
कर्क : आज तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगली फळे मिळतील.आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या विचारांचा तुमच्या मताचा इतरांवर प्रभाव राहील. आत्मविश्वासपूर्वक सगळी कामे आज आपण पूर्ण करणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमच्यात सकारात्मक ऊर्जा असेल.
सिंह : तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्हाला समाधान वाटेल. पण अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील. आळस झटकून कामाला लागणे योग्य आहे. प्रवासात व वाहने चालविताना आज आपणाला काही अडचणी जाणवणार आहेत. योग्य विचार करूनच गुंतवणूक करा. व्यवसायिकांनी गरजेनुसारच माल साठवावा.
कन्या : नशिबाच्या जोरावर चांगले नाव कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामे यशस्वी होणार आहेत. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. योग्य विचार करूनच गुंतवणूक करा. व्यवसायिकांनी गरजेनुसारच माल साठवावा.
तूळ : तुमच्या भावना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे बोलून दाखवू नका. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींने अनुकूल असणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्यावर असणारा कामाचा ताण कमी होईल. अचानक लाभ मिळाल्याने तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही.
वृश्चिक : कौटुंबिक जीवनात सतत होणारी भांडणे आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. नवीन मार्ग सापडणार आहे. आज तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. आज काही विरोधकांना गप्प करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. प्रवास सुखकर होणार आहेत. जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील.
धनु : व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणाशीही भागीदारी करणे टाळावे. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आज तुमचे मोठे नुकसान होण्याची पूर्ण शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावेत. दैनंदिन कामे रखडतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात.
मकर : एखाद्या परीक्षेत यश मिळाल्यावर विद्यार्थ्यांना आनंद होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल. अन्यथा नुकसान होण्याची भीती आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्या भागीदारांमध्ये पारदर्शकता आणि स्पष्टता ठेवावी.
कुंभ : व्यावसायिकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही.तुम्ही कुटुंबातील सदस्याकडून काही मागितल्यास तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. वाहने सावकाश चालवावीत. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला क्षणिक रागाच्या सवयीवर नियंत्रण ठेवावं लागेल.
मीन : व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामात गती ठेवावी, नाहीतर काही अडचणी येऊ शकतात. आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवासात आनंददायी घटना घडेल. कामाचा ताण कमी असणार आहे. आज आळस झटकून स्वत:ला पुढील कामांसाठी तयार करावे लागेल. प्रवासाचे योग येतील. तुमच्या आवडत्या व प्रिय व्यक्तीसोबत हितगुज कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.