मेष राशी :- वाद घालू नका. कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहिल. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. दुपारनंतर अनपेक्षित खर्च संभवतो. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. दुपारनंतर अनपेक्षित अडचणी संभवतात. आपल्याला काही अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. शुभ रंगः पांढरा.
वृषभ राशी :- दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे.महत्त्वाचे निर्णय दुपारनंतर घ्यावेत. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. महत्त्वाच्या खर्च घेण्यासाठी दुपारनंतर नियोजन करावे. मनोबल उत्तम राहणार आहे. शुभ रंगः लाल.
मिथुन राशी :- मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आज तुम्ही जिद्दीने कार्यरत राहणार आहात. मानसिक ताकदीच्या जोरावर येणाऱ्या अडचणीवर मात करणार आहातशुभ रंगः पिवळा.
कर्क राशी :- आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. नातेवाईक भेटतील. जिद्दीने कार्यरत रहाल. प्रवास होतील. उत्तम राहील. काहींना आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. मनोबलशुभ रंगः पांढरा
सिंह राशी :- धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ संभवतो. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचा आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना दुपारनंतर घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. शुभ रंगः लाल.
कन्या राशी :- कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल. घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. तुमचे मनोबल कमी करणारी घटना दुपारनंतर घडेल. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो आज नकोत. आरोग्याच्या तक्रारी राहतील. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. शुभ रंगः हिरवा.
तूळ राशी :- दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल. शारीरिक रूपातून मन आनंदीत राहिल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवासात फायदा होईल. शुभ रंगः पिवळा.
वृश्चिक राशी :- कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. खर्च वाढेल. मनावर स्थिरता ठेवा. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांच्या झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न राहिल. तुमचा प्रभाव राहील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. शुभ रंगः हिरवा.
धनु राशी :- दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मन स्थिर ठेवल्यामुळे, आरोग्य चांगले राहिल. वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. दुपारनंतर काहींना प्रवासाचे योग संभवतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. शुभ रंगः पांढरा.
मकर राशी :- नकारात्मक विचार करू नका. वाईट गोष्टींमुळे मन अस्थिर राहिल. कौटुंबिक वातावरणात परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या. कोणत्याही कामाची सुरूवात करू शकता. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल. दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. अचानक धनलाभ होईल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. काहींना नवा मार्ग सापडणार आहे. शुभ रंगः लाल.
कुंभ राशी :- तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहिल. धनप्राप्ती होऊ शकते. जीवनात अपयश येईल आणि अधिक खर्च देखील वाढेल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. कामाचा ताण राहणार आहे. दुपारनंतर काहींना प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. शुभ रंगः निळा.
मीन राशी :- आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. मन प्रसन्न ठेवा.काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करावीत. प्रवासाचे योग येतील. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. शुभ रंगः जांभळा.
















