मेष : शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. दुपारनंतर परिस्थिती काहीशी प्रतिकूल असेल. तुमची कोणतीही महत्त्वाची योजना अपूर्ण राहू शकते. कौटुंबिक प्रकरणे पुढे जाऊ शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्यांशी मतभेद संभवतात.
वृषभ : पैशाच्या वितरणाशी संबंधित प्रकरणे परस्पर समंजसपणाने सोडवली जातील. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी गेल्याने शांतता लाभेल.कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.
मिथुन : नवीन योजनेवर काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. मित्र किंवा नातेवाईकाशी वादामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. एखाद्याला केलेली शिफारस तुम्हाला नकारात्मक परिणाम देईल.संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत.
कर्क : कोणतेही गुंतागुंतीचे कामही मित्रांच्या मदतीने सोडवले जाईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना होऊ शकते. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल. दिवस शुभ फलदायी ठरेल.
सिंह : तुमचे धाडस आणि कार्य नैतिकता चांगली राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावे. माध्यमांशी संबंधित लोकांमध्ये सर्जनशील क्षमता विकसित करण्याची इच्छा असेल. व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. अनामिक भीती लागून राहील. कठोर मेहनत घ्यावी लागेल.
कन्या : लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मात्र, तुमचे विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. दुपारनंतर तुम्हाला काही अप्रिय बातमी मिळू शकते, ज्यामुळे कामात अडथळा येऊ शकतो. बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचे योग्य नियोजन करावे. अति श्रमाचा थकवा जाणवेल.
तूळ : मुलांशी संबंधित काही योजना आखल्या जातील. सर्व मानवी नातेसंबंध गोडव्याने हाताळण्याचा प्रयत्न कराल. प्रियजनांच्या भेटीमुळे आनंद मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास काळजीपूर्वक करावा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.
वृश्चिक : काही सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. महत्त्वाचे व्यवहारही होतील. पाहुण्यांचे मनोरंजन करून तुम्हाला आनंद मिळेल. कुटुंबासोबत खरेदी आणि मनोरंजनातही वेळ जाईल. प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता. सरकारी कामे अडकण्याची शक्यता. निराशाजनक विचार टाळा.
धनू : तुमची कोणतीही महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. युवकांनी कोणत्याही स्पर्धेची तयारी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नक्कीच यश मिळेल. घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. जुनी येणी प्राप्त होतील. घरगुती प्रश्न लक्षात घ्या.
मकर : कुटुंबासोबत मजेशीर उपक्रम होतील. तुमची प्रतिभा सर्वांसमोर येईल. तुमचे एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे येऊ शकतात. भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. पैज जिंकता येईल.
कुंभ : धोकादायक कामे टाळा. गेल्या काही वर्षांपासून तुम्हाला सतावत असलेल्या समस्येवर तोडगा काढणे कठीण होईल. काही अप्रिय बातम्यांमुळे तुमचे मन निराश होईल. मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुलभ असेल. महिला वर्गासाठी विशेष दिवस.
मीन : व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मुलाच्या वागण्यात काही त्रास होईल. संवाद साधताना योग्य शब्द वापरा. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी वेळेवर सांभाळा.